आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायंदाच्या राखी पौर्णिमेला चिनी राख्यांना देशी राख्यांची कडवी टक्कर पाहायला मिळत आहे. घरगुती तसेच महिला बचत गट आणि विशेष मुलांनी तयार केलेल्या राख्यांनाही जोरदार मागणी आहे. याशिवाय मुंबईच्या बाजारपेठेतून आलेल्या कार्टूनच्या राख्यांनाही विशेष पसंती मिळत असल्याचे दिसत आहे.
महिला बचत गटासह हौशी आणि व्यावसायिक महिला मंडळीच्या घरगुती राख्यांनाही पसंती मिळत आहे. तिरंगा राखी, रुद्र ,कुंदन , मोती राखी ,रेशमी राखी, गोंड्याच्या राखी गणपती राखी सुपारी राखी, मणी राखी, आभा राखी, नागमणी राखी नवरंगी राखी अशा असंख्य प्रकारच्या देशी स्वरूपातील राख्या बाजारपेठेत उपलब्ध झाल्या आहेत. पाच रुपयांपासून शंभर रुपयांपर्यंत त्यांच्या किमती आहेत. विशेष म्हणजे चांदीच्या राख्यांचे भरपूर प्रकार उपलब्ध झाले आहेत.
रक्षाबंधनदिनी भ्रदा पण उत्सव आनंदाने करा :
रक्षाबंधन दिवशी भद्रा आहे. पण, त्याचे कोणतेही बंधन रक्षाबंधनास नाही, असे पंचांगकर्ते ओंकार दाते यांनी सांगितले. श्री. दाते म्हणाले,“पूर्वी रक्षाबंधनादिवशी राजे, महाराजा होम करायचे. अलीकडच्या काळामध्ये रक्षाबंधनास होमहवन विधी सहसा होत नाही. रक्षाबंधनास भद्राचे कोणतेही बंधन नाही, त्यामुळे रक्षाबंधन सोहळा करावा, असेही दाते यांनी सांगितले.
देशी कार्टून राख्यांचे आकर्षण
देशी कार्टूनच्या राख्याही अहमदाबाद, मुंबई येथून आल्या आहेत. यात वेगवेगळ्या रंगाच्या लाइट लागणे, संगीताचा अंतर्भाव असलेल्या राख्या पूर्वी चिनी राख्यात होत्या आता तशाच देशी राख्या देखील आल्यामुळे चिनी राख्यांची मागणी कमी झाली आहे.
बॉक्स राखीची वेगळी संकल्पना
रिद्धी मेंढापुरे या युवतीने आपल्या कल्पकतेने एक बॉक्समध्ये चॉकलेट, हळदी कुंकू, अक्षता, राखी असा सेट तयार केला आहे. जो आपण प्रवासात आरामात नेऊ शकतो. शिवाय त्यात असलेल्या सर्व गोष्टींमुळे कुठेही सहज रक्षाबंधन साजरा करू शकतो. याला युवतींची अधिक पसंती मिळत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.