आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा नोंद:ट्रकमधून 11 लाखांचे सिगारेट बॉक्स लंपास

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयशर ट्रकवरील ताडपत्री व दोरी कापून सुमारे ११ लाख रुपयांचे सिगारेटचे बॉक्स चोरून नेल्याची तक्रार महेश दिगंबर भोसले (वय २५, रा. माळवाडी सरकोली, ता. पंढरपूर) यांनी जोडभावी पेठ पोलिसांत दिली.

२७ नोव्हेंबर रोजी डिग्रजवाडी पुणे येथून निघालेल्या या आयशर ट्रकमध्ये सिगारेट, बिस्कीट व चिप्सचे बॉक्सेस होते. २८ नोव्हेंबर रोजी कैलास एंटरप्रायझेस, घोंगडी वस्ती येथे हा ट्रक आल्यानंतर प्रवासादरम्यान ड्रायव्हर साइडची ताडपत्री उचकटून, रस्सी तोडून चोरी झाल्याचे निदर्शनास आले. सिगारेटचे ११ बॉक्स, िबस्किटांचे तीन बॉक्स, चिप्सचे दोन बॉक्स यांची चोरी झाली. याची किंमत सुमारे ११ लाख ४८ हजार १५१ रुपये इतकी आहे. अज्ञात चोरट्याविरूद्धध् गुन्हा नोंद झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...