आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आश्वासक प्रतिक्रिया:नागरिक , विमानसेवा कधीपासून ? आयुक्त ही शेवटची भेट असेल

साेलापूर8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्त झालेल्या शीतल उगले-तेली यांच्यासमाेर मंगळवारी साेलापूर विकास मंचचे शिष्टमंडळ विमानसेवेचा प्रश्न घेऊन गेले हाेते. सिद्धेश्वर कारखान्याने बेकायदेशीर उभी केलेल्या काे-जनरेशनच्या चिमणीमुळे ही सेवा थांबल्याचे सांगितले. निराेपात शिष्टमंडळाने विचारले, ‘‘विमानसेवा कधीपासून?’’ त्यावर आयुक्त म्हणाल्या, ‘‘ही आपली शेवटची भेट असेल.’’ त्यांच्या या आश्वासक प्रतिक्रियेने आंदाेलक मंडळीच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटली.

हाेटगी रस्त्यावरील विमानतळावरून नागरी सेवा देण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयामाेरील पूनम गेटवर विकास मंचने चक्री उपाेषण सुरू केले आहे. मंगळवारी त्याच्या १६ वा दिवस हाेता. आंदाेलनकांच्या शिष्टमंडळाने उगले यांची भेट घेतली. चर्चा केली. या वेळी विकास मंचचे केतन शहा, मिलिंद भोसले, विजय जाधव, अॅड. दत्तात्रय अंबुरे, मनोज क्षीरसागर, अॅड. प्रमोद शहा, आनंद पाटील, प्रसन्न नाझरे आदी उपस्थित हाेते.

५ डिसेंबरला सुनावणी
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार एनजीटीने सुनावणी घेतली. त्यानंतर महापालिकेने सुनावणीची तारीख दिली. साेमवारी सुनावणी अपेक्षित हाेती. परंतु मावळते आयुक्त पी. शिवशंकर यांची नागपूरला बदली झाली. त्यांच्या जागी उगले-तेली यांनी पदभार घेतला. त्यांच्यासमाेर सुनावणीची फाईल आली. त्यांनी प्रश्न समजून घेतला. त्यानंतर ५ डिसेेंबरला पुढील सुनावणी ठेवली. त्याची माहिती उगले-तेली यांनी विकास मंचच्या शिष्टमंडळाला दिली.

बातम्या आणखी आहेत...