आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेत्रदानाचा गैरसमज दुर करा:पंधरावाड्यानिमित्त प्रबोधन; शाळा, महााविद्यालयासह नागरिकांना संमती पत्र भरण्याचे आवाहन

सोलापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेत्रदान ही एक चळवळ असून ती सर्वांच्या मनात रुजवल्याशिवाय तिचा प्रसार व प्रचार होणार नाही. नेत्रदानाचे संमतीपत्र नागरिकांनी स्वत:हून पुढे येवून भरावीत. यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडून नेत्रदान पंधरवडा साजरा होत आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यायले, शासकीय कार्यालयात संमतीपत्र भरण्यासाठी नागरिकांमध्ये प्रबोधन व जागृती करण्यावर भर दिला जाणार आहे. त्याचे उद्घाटन सिव्हिल सर्जन डॉ.प्रदीप ढेले यांच्या हस्ते झाले.

शल्यचिकित्सक व जिल्हा अंधत्व नियंत्रण समितीच्यावीने नेत्रदान पंधरावाडा आयोजित केला जात आहे. याअंतर्गत विविध ठिकाणी नेत्र दानाबद्दल जागृती केली जाणार आहे. नागरिकांच्या मनामध्ये गैरसमज आहेत त्याबद्दल चर्चा केली जाणार आहे. दरवर्षी भारतात एक लाख लोकांना नेत्र बुबुळांचे गरज असते. त्यापैकी १५ ते २० हजार बुबुळ जमा करु शकतो. ज्या रुग्णांना नवीन बुबुळ्याची गरज आहे, त्यांना दान करुन दृष्टी देवू शकतो.

जिल्ह्यात असलेल्या आरोग्य केंद्रातून किमान ७५ संमतीपत्र भरण्यात येणार आहेत. असे एकुण ७७ प्राथमिक आरोग्य केंद्रातून ही संमती पत्र भरण्यात येणार आहेत.तसेच उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयामध्ये नेत्रदान वर जनजागृती करण्यावर भर दिला जाणार आहे. कोरोनामुळे दोन वर्षात काम थंडावले होते. या पंधरा दिवसाच्या कालावधी जास्तीत जास्ती प्रबोधन करीत संमती पत्र भरुन घेतली जाणार आहेत.

नेत्रपेढीशी संपर्क साधा

अगदी लहान मुलांपासून ते अति वृध्द व्यक्तीपर्यंत कोणीही आपले नेत्रदान करण्याचा संकल्प करु शकतो. डोळ्याला चष्मा, ऑपरेशन झालेले, मुधमेह, संधीवात,ब्लडप्रेशर असलेले बुबुळाचे दान करु शकतो. संमती अर्ज भरलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्यांच्या नातेवाईकांने जवळच्या नेत्रपेढीशी संपर्क साधवा.

गैरसमज दूर करा

''नेत्रदानाविषयी लोकांमध्ये अंधश्रध्दा व गैरसमज आहेत. तरी शाळा,महाविद्यालये व शासकीय कार्यालयात जावून जनजागृती केली जाणार आहे. हे ऐच्छिक असून मृत्यूनंतरही नेत्रदान करता येते. मृत्यूनंतर नेत्रदान करण्याची प्रक्रिया चार ते सहा तासात पूर्ण होणे अपेक्षित आहे. दान केल्यानंतर चेहरा विद्रुप होत नसून या चळवळीत सहभागी हाेवून महान कार्य करावे.''- डॉ. प्रदीप ढेले, सिव्हिल सर्जन

बातम्या आणखी आहेत...