आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शमी वृक्षाच्या संरक्षणासाठी नागरिक करणार आमरण उपोषण:पार्क स्टेडीयमजवळील वृक्षाजवळ असलेले अतिक्रमण काढण्याची मागणी

सोलापूर8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पार्क स्टेडियम लगत असलेल्या शमी वृक्षाचे संरक्षण करावे त्यापरिसरातील अतिक्रमण, बेकायदेशीर कठडे बांधकाम तत्काळ काढून टाकावे यांसह आदी मागणीसाठी मध्यवर्ती नवरात्र महोत्सव मंडळाचे सचिव दत्तात्रय मेनकुदळे गुरुवारपासून शमी वृक्षाच्या जवळ असलेल्या चार पुतळा समोर आमरण उपोषण करणार आहेत.

हिंदूत्वाचा मुद्दा घेऊन सत्तेवर आलेल्या मुख्यमंत्री कार्यालयाने हिंदूच्या पाठीशी उभे राहावे. अतिक्रमण काढण्यास अडथळा आणू नये अशी मागणी मेनकुदळे यांनी पत्रकार परिषदेत केली. तसेच वृक्षाचे नायनाट करण्याचा प्रयत्न सुरु असून, त्या वृक्षाचे जतन करावे. अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.

पक्षांना त्रास होतो

हिंदू धर्माच्या रूढी परंपरेने विजयादशमी दिवशी शमी वृक्षाला प्रदक्षिणा घालून दसऱ्याचे सीमोल्लंघन करण्याची परंपरा आहे. यानिमित्ताने येथे गर्दी होते. या वृक्षाच्या परिसरात हातगाडी व्यवसायिकांनी सिमेंट काँक्रिटीकरण, अँगलचे शेड उभे केले. शमी वृक्षावर बसणाऱ्या पक्षांना हुसकावून लावण्यासाठी अनाश्यकपणे फटाके उडवत आहेत. त्यामुळे पक्षांना त्रास होतो.

वृक्ष-पक्षीप्रेमींनी सहभागी व्हावे

त्या वृक्षाचे नायनाट करण्यासाठी बुंध्यांना हानी पोहचवण्याचे काम सुरु आहे. असे झाल्यास पुरातन वस्तू असलेले शमी वृक्षास हानी पोहचेल. या परिसरात असलेले अतिक्रमण व बेकादेशीर बांधकाम कायमस्वरुपी काढावे. ते नाही काढल्यास गुरुवारपासून चार पुतळा समाेर आमरण उपोषण करणार असल्याचे मनकुदळे म्हणाले. या आंदोलनात नागरिक, वृक्ष व पक्षीप्रेमी यांनी सहभागी व्हावे असे आवाहन मेनकुदळे यांनी केले. यावेळी विजय पुकाळे, सुधाकर इंगळे महाराज, गौरव जगताप, दास शेळके आदी उपस्थित होते.

मंत्री व त्यांच्या समर्थकांनी फोन करु नये

राज्यात हिंदूंचे सरकार असेल तर हिंदू परंपरा जपण्यासाठी शमी वृक्षाचे संरक्षण करण्याकरिता महापालिका प्रशासन येथील अतिक्रमण काढत असताना मुख्यमंत्री, मंत्री तानाजी सावंत, मुख्यमंत्री कार्यालयाचे मंगेश चिवटे यांनी पालिका प्रशासनाला रोखू नये, फोनही करू नये. उलट हिंदू पूजा स्थळासाठी त्यांनी सहकार्य करावे असे आवाहन मेनकुदळे यांनी यावेळी केली.