आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:सिव्हिलचे रक्तदानासाठी सामाजिक संस्थांना आवाहन

सोलापूर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील विविध आजाराने ग्रस्त असलेले रुग्ण दाखल होतात. त्यांना रक्ताची गरज असते. अपघात व शस्त्रक्रिया दरम्यान अनेकांना रक्त गटाची आवश्यकता असते. कारण सिव्हिल रक्तसंकलन केंद्रात सध्या रक्ताचा तुटवडा आहे.

तरी जिल्ह्यातील विविध संस्था,संघटना, शासकीय कार्यालयातील नागरिकांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रक्तदान करुन सहकार्य करावे असे आवाहन विकृती शास्त्र विभाग प्रमुख डॉ. दंतकाळे यांनी केले आहे.सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एकमेव शासकीय रक्तपेढी असून शस्त्रक्रियेसाठी, प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांसाठी तसेच रक्तविकाराशी निगडित असलेल्या रुग्णांसाठी येथील शासकीय रक्तपेढीतून रक्तसाठा पुरवला जातो.

बातम्या आणखी आहेत...