आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू होणार:केंद्रीय उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंची ग्वाही

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय उड्डाण मंत्री ज्योतिर आदित्य सिंदिया यांनी होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू करण्याची ग्वाही शुक्रवारी (02 डिसेंबरला) दिली.

शिष्टमंडळाचे केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिदित्य सिंदिया यांनी बोला सोलापूरकर असे संबोधुन स्वागत केले. केंद्र सरकारच्या अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक उडान योजने अंतर्गत सोलापूरची दोन वेळा निवड करण्यात आली.

अलाईंझ एअरचे सोलापूर हैद्राबाद आणि स्पाईस जेटचे सोलापूर बेंगलोर ह्या मार्गावर ह्या योजने अंतर्गत प्रस्ताव आमच्या संबंधित विभागास प्राप्त झाले असून, होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संबंधित विभागांशी आम्ही संपर्कात असून सोलापूरांना केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयाच्या उडान योजने अंतर्गत नागरी विमानसेवेचा लवकर लाभ कसा मिळेल ह्यावर सकारात्मक निर्णय निश्चित घेण्यात आला असल्याची माहिती केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिर आदित्य सिंदिया यांनी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी, सोलापूर विकास मंचचे सदस्य केतनभाई शहा आणि योगीन गुर्जर यांना दिली.

गेल्या 27 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील पुनम गेट समोर होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू होईपर्यंत चक्री उपोषणाला देशा विदेशातुन पाठिंबा वाढत असल्याची माहिती सोलापूर विकास मंचच्या सदस्यांनी दिली. त्यावर ज्योतिदित्य सिंदिया यांनी सोलापूर विकास मंचच्या या आंदोलनाची इत्यंभूत माहिती असल्याचे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...