आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नदीपात्रात बुडून मृत्यू:सीना नदीपात्रात पोहताना थकल्याने सिव्हिलमधील डॉक्टरचा बुडून मृत्यू, रिधोरे (ता. माढा) येथील बंधाऱ्याजवळील दुर्घटना

कुर्डुवाडी11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सीना नदीपात्रात पोहताना थकल्याने पाण्यात बुडून एका तरुण डॉक्टराचा मृत्यू झाला. बुधवारी (दि. ४) दुपारी १.३० च्या सुमारास रिधोरे (ता. माढा) येथील बंधाऱ्याजवळ ही दुर्घटना घडली. रेहान अरिफ सय्यद (वय २६, रा. कसबा पेठ, इंदापूर, जि. पुणे) असे त्यांचे नाव आहे.

अवेज जलेल मौलानी (वय २१, रा. कसबा पेठ, इंदापूर, जि. पुणे) यांनी येथील पोलिसांत खबर दिली आहे. त्यावरून येथील पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. डाॅ. रेहान हे सुटीनिमित्त कुटुंबीयांसह त्यांच्या वडिलांचे मित्र संजय सरोदे (रा. म्हैसगाव, ता. माढा) यांच्या शेतात गेले होते. रेहान, अमन व जिब्रान सय्यद हे तिघे भाऊ पोहण्यासाठी सीना नदीपात्रात गेले होतेे. पोहताना रेहान हे बंधाऱ्याच्या दाराजवळ पोहोचले. ते त्यांच्या ध्यानात आले नाही. बंधाऱ्याच्या दाराच्या दिशेने पाण्याच्या प्रवाहाचा वेग असल्याने त्यांना नदीतीराकडे येता आले नाही. त्यामुळे थकल्याने ते पाण्यात बुडाले. बंधाऱ्याच्या दाराजवळ जाऊन भाऊ अमन व जिब्रान यांनी त्यांना बाहेर काढले. मात्र, ते बेशुद्धावस्थेत होते. उपचारासाठी त्यांनी कुर्डुवाडी ग्रामीण रुग्णालयात आणले. परंतु डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. रेहान यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन भाऊ असा परिवार आहे.

पुण्यात केले एमबीबीएस रेहान यांचे पुणे येथील महाविद्यालयात एमबीबीएसचे शिक्षण झाले. सध्या ते सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कार्यरत होते, असे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...