आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक:पालिका कर्मचारी असल्याचे सांगत 12 तोळे सोने लंपास

सोलापूर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‌ शहरातील दमाणीनगर परिसरात राहणारे निवृत्त प्राध्यापक यांच्या घरातून दोन भामट्यांनी साडेबारा तोळे दागिने आणि पाच हजार रुपये पळवले आहेत. घरात आल्यानंतर आम्ही महापालिका कर्मचारी आहोत. तुमच्या बाथरूमचे कनेक्शन ड्रेनेज लाइनला जोडायचे आहे, असे सांगत त्यांना बोलण्यात गुंतवून ठेवले आणि दुसऱ्याने कपाटातील १२ तोळे सोन्याचे दागिने चोरल्याची घटना समोर आली आहे.

अभिजित दिनेश सुरवसे (रा. भैरव कॉलनी, दमाणीनगर) यांनी फौजदार चावडी पोलिसात फिर्याद दिली आहे. अभिजित यांचे भय्या चौकात दुकान आहे. ते सकाळीच दुकानात आले. वडील गणेश सुरवसे हे निवृत्त प्राध्यापक आहेत. पत्नीसह ते घरात होते. साडेदहाच्या सुमाराला दोन तरुण दुचाकीवर परिसरात आले. सुरवसे यांचे घर कुठे आहे असे एकाला विचारले. चोरटे घरात आल्यानंतर ‘आम्ही महापालिका कर्मचारी आहोत, आपल्या बाथरूमचे कनेक्शन जोडायचे आहे’, असे सांगितले. काही ठिकाणी बाथरूमचे माप घेण्यासारखे केले. ‘तुम्ही टॅक्स भरला आहे का?’ अशी विचारणा केली. एकाने बोलण्यात गुंतून ठेवत दुसऱ्याने चोरी केली. पंधरा ते वीस मिनिटांनंतर ‘हे तुमचे काम असू दे, आम्ही काही वेळात येतो’, असे सांगत तोही निघून गेला. याप्रकरणी तपास सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...