आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातीन लाख रुपये व्याजाने घेऊन चार लाख ८० हजार रुपये फेडले तरी आणखी देण्याचा तगादा लावल्याप्रकरणी एका महिला वकिलाच्या विराेधात पाेलिसांत गुन्हा दाखल झाला. अॅड. गुरुदेवी रेवणसिद्ध कुदरी (रा. भवानी पेठ, मड्डी वस्ती) असे त्या महिलेचे नाव आहे.साेमवारी सहकार विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांच्या घरी छापा मारला. घरात काेरे धनादेश, नाेंदणी वही सापडली. त्यावर आणखी काही लाेकांना व्याजाने रकमा दिल्याच्या नाेंदी आढळून आल्या. अवैध सावकारी असल्याचा आक्षेप घेत, सहकार अधिकारी विश्वनाथ नाकेदार यांनी जाेडभावी पाेलिस ठाण्यात साेमवारी रात्री फिर्याद दिली. सावकारी नियंत्रण कायद्यानुसार गुन्हा दाखल झाल्याची माहिती पाेलिस निरीक्षक शिवाजी राऊत यांनी दिली.
अधिक माहिती अशी : वैजयंती सोमनाथ पाटील (रा. वळसंग ) यांनी अॅड. कुदरी यांच्याकडून तीन लाख रुपये घेतले होते. व्याज आणि मुद्दल असे मिळून त्यांनी ४ लाख ८० हजार दिले. त्यानंतरही आणखी पैशाची मागणी केल्यामुळे सौ. पाटील यांनी सहकार विभागाचे शहर उपनिबंधक यांच्याकडे लेखी तक्रार केली. त्यानुसार श्री. नाकेदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी साेमवारी अॅड. कुदरी यांच्या घराची झडती घेतली. त्यांच्यासमवेत पाेलिसही हाेते. काेरे धनादेश आणि इतरांना व्याजाने पैसे दिल्याची नाेंदवही जप्त करण्यात आली.
अवैध सावकारीत महिला
लाॅकडाऊन काळात राेजगार नसल्याने गरजूंनी सावकारांकडून व्याजाने पैसे घेतले हाेते. दुसऱ्या लाटेतही लाॅकडाऊन झाल्याने घेतलेले पैसे फेडणे अवघड झाले हाेते. सावकारांच्या तगाद्याला कंटाळून लाेकांनी आत्महत्या केल्या हाेत्या. त्यावेळचे पाेलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी अशा प्रकरणात लक्ष घालून थेट तक्रार करण्याचे आवाहन केले हाेते. त्यांच्या कार्यकाळात ५२ सावकारांना अटक करण्यात आली हाेती. त्यात महिलाही हाेत्या. बाळे, जुना विडी घरकुल, नीलमनगर, माेदी येथील महिला सावकारीत हाेत्या. त्या अल्पशिक्षित हाेत्या. परंतु या प्रकरणातील सावकारीतील महिला कायद्याच्या पदवीधर आहेत, हे विशेष.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.