आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइवल्याशा हातांची सुंद्रीवरची पकड कधी घट्ट तर कधी अलवार करत सुंद्रीच्या मधुर सुरातून राग दुर्गा आणि मिश्र कजरी बरसला अन् बालगंधर्व संगीत महोत्सवात सोलापूरच्या दुर्लभ सुंद्रीचे सूर उमटले. सुंद्रीवादक घराण्यातील मास्टर व्यंकटेश जाधव, कलाश्री जाधव, मास्टर सिद्राम जाधव आणि शकुंतला जाधव या चार बाल कलाकारांनी अतुलनीय अशा सुंद्री वादनातून रसिकांना सुरेल आनंद दिला. लोकमान्य टिळक सभागृहात शनिवारी सायंकाळी बाल गंधर्व सभागृहात आयोजित संगीत समारंभ सोलापूरकरांना अनुभवायला मिळाला. एकामागून एक असे दोन राग सादर करत या बाल चमुनी सर्वांनाच सुरानंद दिला.
राग दुर्गामध्ये तीन तालात धून सादर
सुरुवातीला या चारही कलाकारांनी राग दुर्गा मध्ये तीन ताल व द्रुत तीन तालात धून सादर केली. तर मिश्र कजरी रागातून साधी धून सादर केली. ही धून शास्त्रीय जरी असली तरी ती सामान्य रसिकांना नेहमी ऐकायला मिळणारी असावी असा आग्रह हा सादरीकरणात होता. त्यामुळे नेहमी ऐकली जाणारी गुणगुणली जाणारी मिश्र धून सादर करण्यात आली.
दुर्लभ सुंद्री वाद्य
कला अकादमी सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार केंद्रीय संगीत नाटक अकादमी मल्हार डिजिटल ,रामेश्वर गुरव गितांजली पेन्ट कंपनी व हॉटेल ऐश्वर्या यांच्या संयुक्त विद्यमाने ४ व ५ मार्च रोजी संगीत प्रतिभा महोत्सव, बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे याचे शनिवारी लोकमान्य सभागृहात उद्घाटन झाले. या प्रसंगी नाट्य परिषदेचे अध्यक्ष विजय साळुंके, प्रशांत बडवे यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाले.
यांचा झाला सन्मान
पुण्याच्या प्रसिद्ध शास्त्रीय गायिका शाश्वती चव्हाण व्हायोलिन वादक के. रोहन नायडू, तर छत्तीसगड मध्ये भरतनाट्यम चा प्रचार प्रसार करणारे प्रीतमदास यांना युवा गंधर्व पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रत्येकी ११०००/- रुपये सन्मान चिन्ह, शाल,श्रीफळ असे पुरस्कार स्वरुप होते.
अडीच महिने रोज तीन तास सराव
या चारही बालकलाकारांनी रोज गुरू भीमण्णा जाधव यांच्या सोबत बसून अडीच महिने रोज तीन तास सराव केला. त्यामुळे अतिशय नजाकतीने आणि राग सादरीकरणात अतिशय मुलायमपणा असल्याचे पदोपदी रसिकांना जाणवत होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.