आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकैवल्य चक्रवर्ती संत श्री ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी रथ प्रस्थानासाठी सज्ज करण्यात आला आहे. व्यवस्थापनाने गुरुवारी (16 जून) बैलजोडी जुंपून रंगीत तालीम घेतली. माऊलींचा पालखी सोहळा 21 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे.
रथाचे कामकाज सुरू
आळंदी मंदिरातील बापू लवंगे यांच्या मार्गदर्शाखाली रथाची दुरुस्ती, स्वच्छतेचे कामकाज सुरू आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील दोन वर्षे रथातून पालखी सोहळा निघाला नव्हता. त्यामुळे रथाच्या चाक, बेअरिंग आदी नव्याने घालण्यात आले आहेत. अंतर्गत स्वच्छता, पॉलिश करून रथ चकचकीत करण्यात आला आहे. बैलजोडीला ओढताना त्रास होऊ नये, याची काळजी घेऊन रथाची बांधणी केलेली आहे. रथाची चाक रबराची आहे. ब्रेकची सोय असल्याने उतराच्या ठिकाणी रथाचा वेग नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत होते. इनर्व्हटर संच, सीसीटीव्ही कॅमेराची रथामध्ये सोय आहे.
बैलांची घेतली काळजी
माऊलीच्या रथाला पांडुरंग वरखडे यांची बैलजोडी जुंपण्यात येते. साडेसहा वर्षांचा सोन्या व माऊली नावाची बैलजोडी या वर्षी पालखी रथ आळंदी येथून पंढरपूरला घेऊन येईल. सोहळ्याच्या निमित्ताने बैलांची काळजी घेतली जात आहे. 2020मध्ये फुरसुंगी येथील खुटवडे यांच्याकडून तीन वर्षांपूर्वी वरखडे यांनी बैलजोडी विकत घेतली होती. सोहळ्याच्या निमित्ताने बैलांचे व्यवस्थापन करण्यात येत आहे. किमान 12 तासांपेक्षाही अधिक वेळ बैलांना उभे रहावे अथवा चालावे लागते. त्यामुळे दररोज शेत-शिवारामध्ये फिरवण्याचा सराव सुरु आहे. गर्दीमध्ये घाबरु नये, याबाबतची विशेष काळजी घेण्यात येत आहे, असेही वरखडे यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.