आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:पालिकेतील सेवक भरती अन् पदोन्नतीचा मार्ग मोकळा; राज्य शासनाच्या नगरविकास विभागाची मान्यता

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महानगरपालिका सेवा (सेवा प्रवेश व सेवा वर्गीकरण) नियम २०२२ नुसार सेवक नियुक्त्या व पदोन्नतीसह ४ हजार ६१२ कर्मचारी आकृतिबंदाच्या साेलापूर महापालिकेच्या प्रस्तावास नगरविकास विभागाने गुरुवारी मान्यता दिली. शहराची हद्दवाढ, लाेकसंख्या व पालिकेच्या कमचाऱ्यांवरील नागरी कामांची जबाबदारी लक्षात घेऊन हा नवा आकृतिबंद मंजूर केला. यापुढील काळात भरती व पदोन्नतीबाबत नव्या नियमावलीनुसार अंमल केला जाईल. आकृतिबंदानुसार पालिकेत ३७४१ पदे असून १२२२ पदे रिक्त आहेत.

यापूर्वी १९६४ साली नियमांचे निश्चितीकरण केले हाेते. सोलापूर महापालिकेने १५ डिसेंबर २०२० रोजी नव्या आकृतिबंदासंदर्भात ठराव करून समिती गठित केली हाेती. समितीने ४ जुलै २०२१ रोजी अहवाल दिला होता. महापालिकेने नगरविकास विभागाकडे हा आकृतिबंद व सेवा नियुक्ती आणि पदाेन्नतीचा प्रस्ताव पाठवला. नगरविकासने १५ डिसेंबर २०२२ रोजी ७२ पानी प्रस्ताव मंजूर केल्याचा आदेश काढला आहे.

शहराच्या १७८.५७ चौरस किलोमीटर भाैगाेलिक क्षेत्रात सन २०११ च्या जनगणनेनुसार ९ लाख ५१ हजार इतकी लोकसंख्या आहे. या नागरी क्षेत्रातील नागरिकांना सुविधा देण्यासाठी २८ डिसेंबर २०२१ च्या शासन निर्णयानुसार ४६१२ पदे मंजूर आहेत. सध्याच्या महापालिका कर्मचाऱ्यांना पदोन्नती देणे, रिक्त १२२२ रिक्त पदे भरताना नवी नियमावली मंजूर झाली आहे.

नेमणुकीची पद्धत निश्चित केली
प्रशासकीय सेवा, तांत्रिक सेवा, वैद्यकीय व निमवैद्यकीय, सार्वजनिक आरोग्य सेवा, अग्निशामक संवर्ग यांचा यात समावेश आहे. गट अ व गट ब मध्ये पालिकेतील अधिकारी असतील तर गट क व ड मध्ये कर्मचारी असतील. नेमणुकीची पद्धत निश्चित करण्यात आली आहे. संगणक ज्ञान व हाताळणी आवश्यक आहे. किमान १८ वर्षे वय हवे.

महापालिच्या अधिकाऱ्यांची दिसली तत्परता
१९६४ मध्ये नियमावली तयार करण्यात आली. त्यानुसार काम करताना अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे महापालिकेचे माजी आयुक्त डाॅ. अविनाश ढाकणे यांनी सेवा नियमावली करण्यासाठी युवराज गाडेकर यांची नियुक्ती केली. गाडेकर यांनी याचा अहवाल तयार केला आणि आता त्याला अंतिम स्वरूप आले.

पदोन्नती देताना टक्केवारी निश्चित
पदोन्नती देताना टक्केवारी निश्चित केली आहे. हे करताना महापालिका सर्वसाधारण सभा व शासनाची मान्यता आवश्यक असणार आहे. प्रशिक्षण कालावधी, शारीरिक पात्रता आणि चारित्र्य पडताळणी आवश्यक असणार आहे. पालिकेचे पद भरताना समिती गठित करणे आवश्यक असून, नेमणूक कार्यपद्धती चाचणी घेण्यात येईल.

बातम्या आणखी आहेत...