आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विडी घरकुल:बंद घर फोडले, अडीच लाखांचा ऐवज लंपास; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

सोलापूर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नोकरीच्या कामानिमित्त पुण्यात गेले असता अज्ञात चोराने बंद घराचे कुलूप तोडून घरातील २ लाख ६१ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीनिवास नागनाथ कोंडा (वय ३३, रा. जुना विडी घरकुल) यांनी फिर्याद दिली आहे. कोंडा हे मेड मेनोर कंपनीत कामाला आहेत. कंपनीची मीटिंग पुणे येथे होती. त्यानिमित्त श्रीनिवास हे पुणे येथे गेले होते. त्यामुळे त्यांचे घर बंद होते. बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोराने घरातील २ लाख ६१ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरुन नेले. ही घटना १४ ते १६ जून दरम्यान घडली. याबाबत श्रीनिवास कोंडा यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. यावरून अज्ञात चोरा विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घराच्या जागेवरून मारहाण
सावरगाव येथील परिसरात घरजागेच्या कारणावरून बाबू एकनाथ शिंणगारे वय ५०, दत्तात्रय बाबू शिणगारे वय २५, उमेशा गणपती शिणगारे वय ३५ या तिघांना बापू कविदास बामणकर, आबा बामणकर, कोंडाजी बामणकर व इतर आठ ते नऊ जणांनी मिळून मारहाण केली. जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत सिव्हील पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...