आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहॉटेल बंद करून जमा रक्कम घेऊन दुचाकीवरून घराकडे निघालेल्या हॉटेल मालकाला अंधारात दुचाकी आडवी लावून अज्ञात तीन चोरट्यांनी डोळ्यात चटणी टाकून मारहाण करत ३९ हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली. ही घटना ५ जून रोजी पहाटे पावणे एक वाजण्याच्या दरम्यान मोहोळ शहराजवळील नरखेड रस्त्याकडे जाणाऱ्या सर्विस रस्त्यावर घडली. याप्रकरणी अज्ञात तीन चोरट्यांनी विरोधात मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विश्वराज विकास भोसले यांचे पुणे महामार्गावर हॉटेल आहे. त हे नरखेड चौकातील पुलाखालून सर्विस रस्त्याने मोहोळ शहराजवळील छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे दुचाकीवर (क्रमांक एमएस १३, सीझेड ०२९६) वरून येत होते. सोबत हॉटेल व्यवसायातून जमा झालेली ३९ हजार रुपयांची रक्कम दुचाकीच्या हॅन्डलला छोट्या बॅगेत अडकवलेली होती. मोहोळ शहराच्या बाजूने एका दुचाकीवरून तोंडाला हातरुमाल बांधलेले तीन अज्ञात चोरटे त्यांच्याजवळ आले. दुचाकी आडवी लावून भोसले यांच्या डोळ्यात व अंगावर चटणी टाकली. त्यामुळे भोसले खाली पडले. इतर दोघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून भोसले यांचे ३९ हजार रुपये काढून घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.