आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निषेध:लिंगायत सेवा संघाकडून सीएम बोम्मई यांचा निषेध

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य लिंगायत सेवा संघाचे अध्यक्ष डाॅ. महादेव जोकारे यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांचा निषेध केला आहे. दोन राज्यांमध्ये विष पेरण्याचे काम तत्काळ थांबवा, अशी मागणी जोकारे यांनी पत्रकार परिषदेतून केली. यावेळी दीपक भुस्तळी, महेश जोकारे, डॉ. विजयकुमार जोकारे, डाॅ. मल्लिकार्जुन उप्पीन उपस्थित होते.जोकारे म्हणाले, महाराष्ट्राने नेहमीच कन्नड भाषा संवर्धन आणि सन्मान केला आहे.

कंदलगावामध्ये १९०४ पासूनची मराठी शाळा आहे. तेव्हापासून मराठी शिकवली जाते. हत्तरसंग कुडल येथे चौथ्या तर धाकटी, कामती येथे पाचव्या शतकातील मराठीतील शिलालेख आहेत. आम्हाला महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न करू नये.

बातम्या आणखी आहेत...