आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गैरसोय:रेल्वे स्थानकात थंड पाणी भरून घेण्याचे केंद्र बंदच; प्रवाशांना पाण्याची बंद बाटलीही मिळत नाही

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने रेल्वेस्थानकात थंड पाण्याचे केंद्र उभारले, मात्र अनेक महिन्यांपासून ते बंद असल्याची तक्रार अनेक प्रवासी करत आहेत. गेल्या काही वर्षापूर्वी सोलापूर स्थानकात वाजत-गाजत थंड पाणी पुनर्भरण केंद्र उभारण्यात आले होते. या केंद्रात पाच रुपये दिल्यानंतर थंड पाणी मिळत असे. लॉकडाऊननंतरही हे केंद्र काही दिवस सुरू होते. आता हे केंद्र बंद असल्याने प्रवाशांची असुविधा होत आहे.

रेल्वे स्टेशनवर ठेवलेले मशीन एका काळ्या ताडपत्रीने पूर्णपणे झाकून ठेवण्यात आले आहे. त्यामुळे मशीन आहे हेही दूरदूरपर्यंत प्रवाशांना कळत नाही, तर दुसरीकडे एक नंबर फलाटावर असलेले मशीन कायम बंद आहे. याबाबत विचारले असता मशीन कधी चालू होईल किंवा काय झाले आहे त्याची उत्तरं कोणीही देत नाही. पंधरा रुपयांची पाणी बॉटल सध्या रेल्वे स्टेशनच्या एकही दुकानात पाहायला मिळत नाही .

प्रवाशांच्या सोयीसाठी पाणी पुनर्भरणाची केंद्र उभे करण्यात आले आहे. मात्र, यातील एकही मशीन सुरू नाही. जर बंद ठेवणार असतील तर ही अडचण फलाटावर ठेवायचीच का ? त्याचा उपयोग झाला पाहिजे. राजू राचरला, प्रवासी नातेवाईक

बातम्या आणखी आहेत...