आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यायाधीशांचा आदेश:वस्तूंचा लिलाव करून 40 लाख जमा करा ; रक्कम जमा करून अहवाल कोर्टात सादर करा

सोलापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

फसवणूक प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी शेखर काटगावकर यांच्या बांधकाम उपयोगी व गृहोपयोगी वस्तूंच्या दुकानातील वस्तूंचा जाहीर लिलाव करा आणि ४० लाख रुपये न्यायालयात जमा करा, असा आदेश विशेष न्यायाधीश व्ही. एच. पाटवदकर यांनी पारित केला आहे.

हरिओम फायनान्स, रिद्धी सिद्धी फायनान्स, नवरत्न फायनान्स, कमर्शियल फायनान्स या माध्यमातून अकराशेहून अधिक गुंतवणूकदारांना जास्त व्याजाचे आमिष दाखवून २५ कोटी रुपयांपेक्षा जास्त ठेवींची फसवणूक केल्याप्रकरणी शेखर काटगावकरसह तिघांवर गुन्हा दाखल आहे. शहर आर्थिक गुन्हे शाखेकडे याचा तपास आहे. काटगावकर यांच्या गृह उपयोगी वस्तू, रुद्र स्टील, रुद्र मशिनरी व ईझी किचन या नावांनी बांधकाम वस्तू विक्रीची फर्म आहे.

गुंतवणूकदारांनी गुंतवलेल्या रकमेतून हे फर्म घेतल्याने पोलिसांनी ती जप्त केली आहे. त्याचा जाहीर लिलाल करून त्यातून आलेली रक्कम न्यायालयात जमा करावी यासाठी विशेष सरकारी वकील संतोष न्हावकर यांनी अर्ज दाखल केला होता, त्या अनुषंगाने हे आदेश पारित केले आहेत.

११०० तक्रारदार अन् ४५ कोटींची फसवणूक
उपजिल्हाधिकारी व पोलिस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा यांनी समन्वयातून काटगावकर यांच्या दुकानातील साहित्यांची विक्री करावी. आलेली रक्कम न्यायालयात जमा करावी. तसा अहवाल न्यायालयात सादर करावा, असे आदेशात म्हटले आहे. विशेष सरकारी वकील म्हणून न्हावकर आणि आरोपीतर्फे शशी कुलकर्णी हे काम पाहत आहेत. एकूण ४५ कोटींची फसवणूक आहे. अकराशेहून अधिक तक्रारदार आहेत. २०१६ मध्ये हे प्रकरण समोर आले होते. शेखर काटगावकर, सुकेशनी काटगावकर आणि नागेश काटगावकर यांच्यावर गुन्हा दाखल आहे.

बातम्या आणखी आहेत...