आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माढा:ऑनलाईन मागवले कलर प्रिंटर, अन् घरातच छापल्या बनावट नोटा, माढ्यातील दोन तरुणांना अटक

माढा (संदीप शिंदे)2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शेळ्या खरेदी करण्यासाठी गेला होता तरुण

ऑनलाइन साइटवरुन वस्तु खरेदी करण्याचे प्रमाण सध्या वाढले आहे. कोण काय मागवेल याचा काय नेम नसतो. माढा तालुक्यातील दारफळ(सिना) गावात वास्तव्यास असलेल्या एका तरुणाने ऑनलाइन कलर प्रिंटर मागवले. कलर प्रिंटर मागवत त्याने नामी शक्कल लढवत प्रिंटर आणि A4 पेपर च्या सहाय्याने बनावट नोटा बनवण्याचा उद्योगच घरी सुरु केला होता.

हा कारनामा करणारा सिद्धेश्वर केचे आता पोलिसांच्या हाती देखील लागला आहे. त्यांचा साथीदार असलेल्या धनाजी पाटलोबा दाडे रा.वाफळे यास देखील ताब्यात देखील घेतले आहे. दोघांची ही रवानगी आता पोलिस कोठडीत करण्यात आली. सिद्धेश्वर राहत असलेल्या दारफळ गावातून त्यांच्या घरातून टेभुर्णी पोलिसांनी 10 हजार किंमतीचा प्रिंटर ताब्यात घेतला. तसेच पोलिसांनी सिद्धेश्वरला ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून 500 आणि 2 हजारांच्या 67 हजारांच्या बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

शेळ्या खरेदी करण्यासाठी गेला होता तरुण

सिद्धेश्वर हा धनाजी दाडे यास टमटम सोबत घेऊन मोडनिंबच्या जनावरांच्या बाजारात शेळ्या खरेदीस गेला होता. शेतकरी कुंडलिक यमनाथ लेंगरे रा.पोखरापुर यांच्याकडून सिद्धेश्वर ने 8 शेळ्या खरेदी केल्या. 5 हजार रुपय प्रती शेळी प्रमाणे 40 हजाराला व्यवहार ही ठरला. सिद्धेश्वरने दिलेल्या नोटांची शेतकरी लैंगरे यांना शंका आली. त्यांनी सिद्धेश्वरकडे दुसऱ्या नोटा मागितल्या. मात्र सिद्धेश्वरने याच नोटा माझ्याकडे आहेत मी आताच एटीएम मधुन काढल्या आहेत असे सांगितले. मात्र शेतकऱ्याने दुसऱ्या नोटा देण्याचा हट्ट धरला. यानंतर सिद्धेश्वरने पळ काढला. दरम्यान शेतकऱ्याने पोलिसांना सांगून त्याचा पाठलाग केला. यानंतर सिद्धेश्वर पोलिसांच्या हाती लागला. दरम्यान टमटम मध्ये शेळ्या घेऊन गेलेल्या धनाजी दाडे याला कुर्डूवाडीतुन अटक केले आहे.

आरोपींनी छापलेल्या नोटा
आरोपींनी छापलेल्या नोटा

नोटा बनावट असल्याची दिली कबूली
स.पो.नि अमित शितोळे यांनी केलेल्या तपासातून कलर प्रिंटरने तो घरातच बनावट नोटा छापत असल्याची बाब समोर आली आहे. आणखी याने कोठे बनावट नोटा खपवल्यात का? अन्य साथीदार या प्रकरणात आहेत का? या अगोदर शेळ्याची खरेदी केली होती का? शेळ्याच खरेदी का करीत होता? यासह अन्य गोष्टींचा उलगडा लावण्यासाठी टेभुर्णी पोलिस कसून तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...