आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाेटीस:मैदानात या, विश्वासार्हता कळेल; विजय देशमुखांचे काडादींना आव्हान

साेलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी पाडण्याची नाेटीस आल्यानंतर मी आणि दिलीप साेपल तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन स्थगिती आणली हाेती. त्याच वेळी धर्मराज काडादींनी चिमणी कायदेशीर करून घ्यायला पाहिजे हाेती. ही वस्तुस्थिती असताना आता ते भाजपवर आराेप करत आहेत. काडादींनी स्पष्ट राजकारण करावे. त्यांनी मैदानात यावे, मग पाहू काेणाची किती विश्वासार्हता आहे, असे आव्हान आमदार विजय देशमुख यांनी दिले आहे.

चिमणीच्या मुद्द्यावर काडादींनी माेर्चा काढून जाहीर सभा घेतली हाेती. त्यावेळी देशमुखांना मंत्री करण्यासाठी मी प्रयत्न केले हाेते, असे वक्तव्य करून चिमणी पाडण्यासाठीच्या प्रयत्नांमागे आमदार विजय देशमुखच असल्याचा आराेप केला हाेता. मंगळवारी सायंकाळी राज्यमंत्र्यांच्या भेटीसाठी उस्मानाबादला जाताना देशमुखांनी उत्तर दिले. चिमणीचा प्रस्ताव आला तेव्हा भाजपची सत्ता नव्हती. ज्यांनी मदत केली म्हणून काडादी सांगतात त्या शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, राेहित पवार यांनी परवानगी का मिळवून दिली नाही? गेल्या अडीच वर्षात त्यांचीच तर सत्ता हाेती, असेही देशमुख म्हणाले.

काडादींनी उघडपणे राजकारण करावे. काेणाच्या तरी आधारावर नको. मी चार वेळा आमदार झालाे. मला येथील जनतेने निवडून दिले आहे, काडादी आणि राेहित पवारांनी नाही. सिद्धेश्वर मंदिर समितीवर मी सदस्यही नाही. माझा काहीही संंबंध नाही. ज्यांनी चूक केली ती त्यांनीच निस्तरली पाहिजे, अशी भूमिका देशमुख यांनी मांडली.

बेकायदा कामाला आम्ही का मदत करावी? : चिमणीच्या बेकायदा कामाला आम्ही का मदत करावी? असा प्रश्न करून काेर्टाच्या आदेशानंतरच कारवाई हाेत आहे. त्यात आमचा काय दाेष. पण भाजप हा विराेधात काम करत असल्याचा आराेप केला जात आहे. आम्ही कधीही विराेध केला नाही. मी कधीही सिद्धेश्वर कारखान्याच्या विराेधात काम केले नाही. विनाकारण भाजपला टार्गेट करण्याचे काम ते करत आहेत. चुकीच्या कामाला काेणीही साेबत रहात नाहीत, हे लक्षात घेतले पाहिजे.

बातम्या आणखी आहेत...