आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहणी:आयुक्तांनी केली स्मार्ट सिटीतील कामांची पाहणी

सोलापूर11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवारी रुजू झालेल्या मनपाच्या आयुक्त शितल तेली-उगले यांनी मंगळवारी शहरात स्मार्ट सिटी योजनेतून झालेल्या इंदिरा गांधी स्टेडियम, होम मैदान, मनपाचे कंट्रोल रूम तसेच एक्झिबिशन सेंटर आणि कामे सुरु असलेल्या रस्त्यांची प्रत्यक्ष जावून पाहणी केली. कामे चांगल्या पद्धतीने पूर्ण करण्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना योग्य सूचना देत मैदानावरील साहित्य हटविण्याचे आदेश त्यांनी दिले.

स्मार्ट सिटीअंतर्गत इंदिरा गांधी पार्क स्टेडियमचे नूतनीकरणाचे करण्यात येत आहे. मंगळवारी सकाळी उगले यांनी पार्क स्टेडियमची पाहणी केली. स्टेडियम मधील मैदान, क्रिकेटचे पीच, परिसरातील सोयी-सुविधा व स्वच्छतेची माहिती घेतली. यावेळी उपायुक्त मच्छिंद्र घोलप, नगर अभियंता संदीप कारंजे, क्रीडा अधिकारी मुर्तुज शहापुरे, माजी नगरसेवक नागेश वल्याळ उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...