आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागण्यांचे निवेदन:आयुक्त हटाव, संपात ७५ टक्के कर्मचारी ;  कारवाईस आयुक्तांनी यादी मागवली

साेलापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अत्याधुनिक बायोमॅट्रिक्स, जीओ टॅग हजेरीप्रणाली बंद करण्यासह दहा प्रमुख मागण्यांसाठी महापालिकेचे कर्मचारी गुरुवारी एक दिवसाच्या संपावर गेले. ‘आयुक्त हटाव’ असा नारा देत कर्मचारी संघटनेने मोर्चा काढला. शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना मागण्यांचे निवेदन दिले.

महापालिकेच्या सर्व कार्यालयात शुकशुकाट होता. नागरिकांची कामे झाली नाहीत. १९९२ नंतर आयुक्तांच्या विरोधात कर्मचारी एकवटले. ४ हजारपैकी ३ हजार कर्मचारी कामावर आले नाहीत. महापालिकेच्या आरोग्य, सामान्य प्रशासन, मुख्य लेखापरीक्षक कार्यालयास कुलूप होते. पार्क चौक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. पोलिसांनी मोर्चा होऊ नये यासाठी प्रयत्न केले पण कामगार संघटनेचे अध्यक्ष अशोक जानराव यांनी ठाम भूमिका घेतली.आयुक्त पी. शिवशंकर यांनी कर्मचाऱ्यांना चर्चेसाठी बोलावले. परंतु मागण्या मान्य असतील तरच चर्चेला येऊ, अशी भूमिका संघटनेने घेतली. त्यामुळे प्रशासन व कर्मचारी यांच्यात तोडगा निघालाच नाही.

महापालिका कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्रमुख मागण्या अशा
१. आयुक्त बैठकांत कर्मचाऱ्यांना दमदाटी करतात. बैठकांतच जास्त वेळ जातो, नागरिकांचे कामे करता येत नाहीत.
२. अतिरिक्त आयुक्त, उपायुक्तआदी दहा वरिष्ठ अधिकाऱ्यांना ई-आॅफिस असूनही तीन-तीन महिने काम होत नाही.
३. मागासवर्गीय रिक्त जागा भरा, लाड व पागे समितीच्या शिफारशींची अमंलबजावणी एका महिन्यात झाली पाहिजे.
४. सफाई कर्मचाऱ्यांना गुगल कॅलेंडरवर काम सांगू नका, जीओ टॅग फोटो बंद करा, वेतन कपात बंद करा.
५. ड्युटी लिस्टप्रमाणे काम घ्या. जबाबदारी नसलेले जादा काम देऊन त्यातील चुकांसाठी वेतन कपात शिक्षा रद्द करा.
६. कर्मचाऱ्यांना डावलून रोड स्वीपरने सुरू असलेले रस्तेसफाईचे काम नीट होत नाही, यावर कुणाचेच नियंत्रण नाही.
७. गुंठेवारी प्रकरण निकाली काढा, शासनाने सांगूनही काम आयुक्त करत नाहीत. त्यामुळे त्यांची तत्काळ बदली करावी.

कामावरून कमी करू
नियमानुसार काम सांगतो. बायोमॅट्रिक्स हजेरीप्रणाली मी येण्यापूर्वीची आहे. काही कर्मचारी जागेवर नसतात. त्यामुळे जीओटॅग फोटो सक्तीचे केले. संपावर न जाण्याची नोटीस दिली होती तरीही ते संपावर गेले. कायम कर्मचाऱ्यांचे एक दिवसांचे वेतन कापू आणि नोटीस देऊ. तसेच मानधनावरील कर्मचाऱ्यांना नोटीस देऊ. समाधानकारक उत्तरे नसतील तर त्यांना कामावरून कमी करू.’’
पी. शिवशंकर, आयुक्त.

संघटना पदाधिकाऱ्यांच्या खात्याची माहिती मागवली
महापालिका कर्मचारी व कामगार संघटनेचे काम करणारे पदाधिकारी व नेते महापालिकेत कोणत्या विभागात कोठे काम करतात यांची माहिती आयुक्तांनी मागवली आहे.

बातम्या आणखी आहेत...