आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुखदायी चित्र:आयुक्त आल्या, पदभार घेतला, तासाभरातच बाहेर पडल्या; ड्रेनेज समस्येच्या जागेवर गेल्या

सोलापूर11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिका आयुक्तपदाच्या खुर्चीवर सोलापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच एक महिला आयुक्त आल्या होत्या. ‘इंद्रभुवन’मध्ये आगमन होताच त्यांचे आैक्षण करण्यात आले. पदभार घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना म्हणाल्या, “नागरिकांचे दैनंदिन जीवन सुखकर होईल,” असेच प्रयत्न राहतील. त्यानंतर तासाभरातच त्या बाहेर पडल्या, थेट ड्रेनेजची समस्या पाहण्यासाठीच.

शीतल उगले-तेली या सोलापूरच्या पहिल्याच महिला आयुक्त म्हणून सोमवारी रूजू झाल्या. त्यानंतर त्यांच्या कार्यशैलीचे हे सुखद चित्र दिसून आले. उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांनी त्यांचे स्वागत केले. उपायुक्त विद्या पोळ, सहाय्यक आयुक्त विक्रम पाटील, मुख्य लेखापाल रूपाली कोळी, नगर अभियंता संदीप कारंजे, आरोग्य अधिकारी डॉ. बसवराज लोहारे आदी या वेळी उपस्थित होते.

नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्याकडे लक्ष राहील, शासनाच्या योजना राबविणार
साेलापूर महापालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त म्हणूून रूजू होण्यात आनंद वाटला. शहरी जीवनात अनेक समस्या असतात. त्यांची सोडवणूक करणे हे कर्तव्यच झाले. शासनाच्या योजना नियोजनबद्ध राबवून नागरी जीवन सुखकर कसे करता येतील, यासाठी प्रयत्न राहतील.-शीतल उगले-तेली, आयुक्त

घेतली दखल ड्रेनेज समस्या प्रकरणी बाळ्यातील नागरिकांचा ठिय्या
आयुक्तांचे आगमन झाले. त्याच वेळी बाळे येथील संतोष नगरातील नागरिक ड्रेनेजची समस्या घेऊन आले होते. पदभार घेण्याची कार्यालयीन आैपचारिकता उरकून सौ. उगले यांनी नागरिकांना बोलावले. गेल्या अनेक दिवसांपासून ही समस्या मांडतो आहोत परंतु दखल घेतली जात नाही, अशी त्यांची कैफियत होती. संबंधित अधिकाऱ्यांना घेऊन त्या धडक संतोषनगरातील समस्येच्या जागीच पोहोचल्या. प्रश्न समजून घेतला.

ड्रेनेज सारखे तुंबत असल्याने पाइपलाइन बदलणे हाच पर्याय होता. सार्वजनिक आरोग्य अभियंता संजय धनशेट्टी यांना तातडीने त्याची मंजुरी घेण्याचा प्रस्ताव देण्यास सांगितले. या वेळी विभागीय अधिकारी व्यंकटेश चौबे हेही उपस्थित होते. पहिल्याच दिवशी ‘मॅडम’च्या कामाची चुणूक अधिकाऱ्यांना कुजबुज करायला लावणारी होती. अर्थातच ‘आता निवांतपणा चालणार नाही,’ अशाच वाक्याने असू शकेल.

बातम्या आणखी आहेत...