आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेवंती फुलांची शेती:दाेन वर्षांच्या तुलनेत या वर्षी शेवंती फुलांचे उत्पादन वाढले, भाव पडले

​​​​​​​साेलापूर4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लाल, पिवळ्या व पांढऱ्या प्रकारात फुले असतात

साेलापूर-मुळेगाव परिसरात शेवंती फुलांची शेती १० ते १२ एकर क्षेत्र आहे. दाेन वर्षांच्या तुलनेत या वर्षी सध्या शेवंती फुलांचे भाव पडले आहेत.पंढरपूर,माेडनिंब परिसरातील फुले पुणे, मुंबई मार्केटला जातात. ती फुले सध्या साेलापूर मार्केटला येत आहेत. दाेन वर्षांच्या काेराेनाकाळात लाॅकडाऊन हाेता तरीही शेवंती फुलांना जवळपास २५० रु.भाव मिळत हाेता.या वर्षी सर्व सण साजरे हाेत आहेत.बाहेरची फुले साेलापूर मार्केटला येत आहेत. त्यामुळे भाव पडले आहेत, अशी माहिती बाळू साेरेगाव यांनी दिली.

फुलांचे भाव कमी, मात्र हारांचे भाव वाढलेलेच सध्याचा दर : 30 ते 40 रु.किलाे गेल्या 2 वर्षांतील दर : 150-250 शेवंती फुलांचे क्षेत्र : 10 ते 12 एकर व्यापारी विकतात : 60 रु.किलाे शेवंतीची लागवड-जूनमध्ये होते. शेवंती पिकाचा कालावधी : 8 महिने एकराला खर्च : 50 ते 60 हजार येताे

मार्गशीर्ष महिना सुरू झाल्याने शेवंतीच्या फुलांच्या मागणीत आणखी वाढ झाली आहे. महिला पूजेसाठी शेवंतीच्या फुलांना अधिक पसंती देतात.

बातम्या आणखी आहेत...