आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंचनामा:गॅस पाइप लाइन टाकताना आंबा बागेचे नुकसान केल्याची तक्रार

सोलापूर6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘आयओसीएल’ ची गॅस पाइप लाइन कोईली, सुरत, अहमदनगर ते पाकणी दरम्यान टाकण्यात येत आहे. त्यासाठी लांबोटी (ता. मोहोळ) येथील शेती गटातील १८ मीटर रुंदर जमीन संपादित केली पण त्या जागेत आंब्याची बाग असून कंपनीने रीतसर मोजणी, मूल्यांकन व पंचनामा, प्रत्यक्ष नोटीस न बजावता, कुटुंबीयांना दमदाटी करीत पोलिस बंदोबस्तामध्ये आंब्याची ४५ झाडे उखडून काढल्याने मोठे नुकसान झाल्याची तक्रार शेतकरी अनुराधा सुधीर ननवरे, सुधीर दगडू ननवरे यांनी पत्रकार परिषदेत केली.

ननवरे यांची लांबोटी येथे शेती गट क्रमांक १२५-५ ‘अ’-‘ब’ आहे. नऊ वर्षांपूर्वी अर्धा एकर जमिनीमध्ये केशर कलमी आंब्याची लागवड केली आहे. विषमुक्त, सेंद्रिय आंबा विक्रीसाठी ‘रानमेवा’ नावाने नोंदणी केली आहे. गॅस पाइप लाइन टाकण्यासाठी १८ मीटर रुंद जमिन संपादित केली आहे. पण, प्रत्यक्षात ती जमीन आंब्याच्या बागेतील आहे. चांगले उत्पादन मिळणारी झाडं त्या जागेत असल्याने त्यांची रीतसर मोजणी, मूल्यांकन व पंचनामा करणे अपेक्षित होते. पण, कंपनीने कोऱ्या पंचनमावर सह्या घेण्यासाठी दबाव आणला. त्यासंदर्भात शासन-प्रशासनाकडे वारंवार निवेदन, तक्रारी अर्ज दिले आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, प्रधान सचिवांना निवेदन दिले आहे. संबंधित कंपनीने आम्हाला विश्वासात न घेता, पंचनामा, झाडांची मोजणी न करताच पोलिस बंदोबस्तामध्ये बागेतील आंब्याची ४५ झाडं उखडून टाकली आहेत.

त्यासंदर्भात ११ नोव्हेंबरला नगर येथील सक्षम अधिकारी के. बी. राजगुरु यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता. पण, खासगी ठेकेदारांच्या मदतीने कंपनीने आमच्या शेतीपिकाचे मोठे नुकसान केल्याची तक्रार त्यांनी केली. इतर शेतकऱ्यांची त्या कंपनीने दिशाभूल करीत चुकीच्या पद्धतीने मोबादला दिल्याचे, त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला बादल ननवरे, सुधीर ननवरे, शरद गवळी, प्रदीप भोसले आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...