आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलेचा छळ:विवाहितेची 25 लाखांसाठी छळाची तक्रार, पतीसह तिघांवर गुन्हा दाखल

सोलापूर2 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

हॉटेल व्यवसायासाठी माहेरहून २५ लाख रुपये घेऊन ये, या कारणावरून सासरी छळ केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.धनंजय बाळकृष्ण ठेंगील (पती), स्वाती सचिन हराळे व अश्विनी सिद्धेश्वर सरवदे ( नणंद) या तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. किरण धनंजय ठेंगील (राघवेंद्र नगर, मुरारजी पेठ- सध्या जोडभावी पेठ, सोलापूर) यांनी १९ मार्च रोजी फिर्याद दिली आहे. २०१४ ते डिसेंबर २०२१ या कालावधीत सासरी व माहेरी हा प्रकार घडला आहे. किरण ठेंगील यांना हॉटेल व्यवसायाकरता माहेरून २५ लाख रुपये आण म्हणून दमदाटी व मारहाण करून शारीरिक छळ केला. तसेच धनंजय ठेंगील यांनी पहिली पत्नी (किरण ठेंगील) असताना एका महिलेसोबत दुसरा विवाह केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...