आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तक्रारी‎:रेशन परवाने वाटपात गैरप्रकाराच्या तक्रारी‎

उत्तर सोलापूर‎24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर सोलापूर तालुक्यातील बारा‎ रेशन दुकान परवान्यांसह‎ जिल्ह्यातील नवीन ६१ दुकानांना‎ परवाना देण्याची प्रक्रिया प्रशासनाने‎ पूर्ण केली. परंतु, नवीन परवाने‎ देताना जुन्याच परवानाधारकांशी‎ संबंधित संस्थांनाच मंजुरी दिल्याचा‎ आरोप होताना दिसत आहे. यामध्ये‎ मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचाही‎ आरोप होत आहे. याबाबत मंत्रालय‎ पातळीपर्यंत तक्रारी दाखल झाल्या‎ आहेत. प्रशासनाने मात्र कोणाचीही‎ तक्रार नसल्याचे म्हटले आहे.‎ विविध कारणांनी जिल्ह्यातील‎ बंद झालेल्या ६१ रेशन दुकानांना‎ नव्याने परवाने वाटण्याची प्रक्रिया‎ जिल्हा पुरवठा विभागाने राबवली.‎

यामध्ये परवाना देताना शासनाने‎ ग्रामपंचायत, स्वयंसहाय्यता महिला‎ गट, नोंदणीकृत संस्था अशांना‎ प्राधान्य देण्याचा नियम घालून दिला‎ आहे. मात्र जिल्हा पुरवठा विभागाने‎ शासनाच्या नियमांचा सोयीने वापर‎ केल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत.‎ काही ठिकाणी परवाने देताना जुने‎ रेशन चालकाच्या कुटुंबातील‎ महिला चालवत असलेल्या‎ गटांनाच नवीन परवाने दिल्याची‎ तक्रार दाखल झाली आहे. काही‎ ठिकाणी राजकीय दबावाखाली‎ परवाने वाटप झाल्याचे दिसून येत‎ आहे. या प्रक्रियेमध्ये मोठा आर्थिक‎ गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला‎ जात आहे.‎

नवीन रेशन दुकान परवाने देताना नियमानुसारच‎ कामकाज करण्यात आले आहे. आमच्याकडे‎ कुठलीही तक्रार आली नाही. याबाबत कोणाची‎ तक्रार असल्यास त्यांनी अपील करावे.‎ - वर्षा लांडगे, जिल्हा पुरवठा अधिकारी‎

जिल्हा पुरवठा विभागाने नवीन रेशन परवाने देताना‎ मूळ दुकानदारांनाच परवाने मिळावे याची काळजी‎ घेतली आहे. इतर महिला बचत गटांची उमेद त्यांनी‎ मारली आहे. - मनीषा लंबे , कळमन.‎

वरिष्ठ पातळीवर तक्रार केली‎
रेशन दुकानाचे परवाने देताना राबवलेली प्रक्रिया‎ नुसता फार्स होता. मोठा आर्थिक गैरव्यवहार केला‎ आहे. जुन्याच दुकानदारांना परवाने मिळावे अशी‎ प्रक्रिया राबवली गेली. याबाबत मी वरिष्ठ पातळीवर‎ तक्रारी दाखल केली आहे.‎- रोहिणी कुंभार, रानमसले‎

बातम्या आणखी आहेत...