आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या पाच दिवसांपासून पंढरपूरकर शिव प्रेमींना ज्वलंत इतिहास दाखवणाऱ्या ‘शिवपुत्र संभाजीराजे’ या महानाट्याची दिमाखात, हजारो शिवप्रेमींच्या उपस्थितीत सोमवारी सांगता झाली. या सांगता समारंभास उपस्थित युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी कार्यक्रमास मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादाचे कौतुक केले.
अभिजित पाटील यांच्या रूपाने सोलापूर जिल्ह्यास एक सुसंकृत, विकासाचे व्हिजन असलेला नेता मिळाला असल्याची भावना व्यक्त केली. दरम्यान ६ जून रोजी रायगडावर संपन्न होत असलेल्या छत्रपती शिवराज्याभिषेक सोहळ्यास अभिजित पाटील यांनी दीड लाख रुपयांची देणगी दिली.
पंढरपूर तालुक्याचे युवा नेते अभिजित पाटील यांच्या संकल्पनेतून छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवपुत्र संभाजी महाराज या महानाट्याचे आयोजन करण्यात आले होते. खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी यामध्ये प्रमुख भूमिका केली आहे. या महानाट्याचा अंतिम आणि पाचव्या दिवसाचे खा. छत्रपती संभाजीराजे यांच्या शुभहस्ते या प्रयोगाचे उद्घाटन झाले. यावेळी माजी मंत्री दिलीप सोपल, शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर, शिवाजीराजे कांबळे, आयुक्त हरीश बैजल, पोलिस अधीक्षक तेजस्विनी सातपुते, पोलिस उपअधीक्षक विक्रम कदम, वसंत नागदे, विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे, जिल्हा परिषद सदस्य वसंतराव देशमुख आदी उपस्थित होते. मागील पाच दिवस चाललेला छत्रपती संभाजीराजे यांच्या चरित्राचा ऐतिहासिक जागर हजारो शिवप्रेमींनी अनुभवला. शहरासह ग्रामीण भागातून वाहने घेऊन हजारो लोक दररोज नाट्यप्रयोग पाहण्यासाठी येत होते. दररोज गर्दी वाढत गेली. त्यामुळे पंढरपूरकर नागरिकांचा या महानाट्यस प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. यावेळी पंढरपूर, नव्हे तर संपूर्ण राज्यातून राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
मी सदैव पाटलांसोबत
छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास सर्वांपर्यंत पोहोचावा यासाठी या ऐतिहासिक महानाट्याचे आयोजन अभिजीत पाटील यांनी केले आहे. ते कौतुकास्पद आहे. अभिजीत पाटील हे अतिशय धाडसी व कार्यक्षम,नेतृत्व आहेत, त्यांच्या रूपाने एक मोठ्या मनाचा व सुसंकृत नेता सोलापूर जिल्ह्याला मिळाला आहे. महानाट्याचा इतका भव्यदिव्य कार्यक्रम सलग मोफत दाखवण्यासाठी मोठे मन लागते, ते मन अभिजीत पाटील यांच्याकडे आहे. मी सदैव अभिजीत पाटील यांच्या सोबत आहे. असे वक्तव्य युवराज छत्रपती संभाजी राजे यांनी यावेळी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.