आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामूहिक विकास योजना:शासकीय तंत्रनिकेतनमध्ये मोफत प्रशिक्षणाचे आयोजन

सोलापूर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तांत्रिक प्रशिक्षण घेऊन तत्काळ रोजगार उपलब्ध व्हावा, तरुण स्वत:च्या पायावर उभे राहावेत यासाठी केंद्र शासन पुरस्कृत सामूहिक विकास योजना शासकीय तंत्रनिकेतमध्ये मोफत प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. विविध १६ प्रकारच्या अभ्यासक्रमाचे मुलांना मोफत प्रशिक्षण देऊन रोजगारभिमुख बनवण्यात येणार आहे. यामध्ये ग्रामीण भागातील मुलांना प्राधान्य देण्यात येणार आहे. गरजू व होतकरू मुलांनी शासकीय तंत्रनिकेतन, शांती चौक अक्कलकोट रोड येथे येऊन नोंदणी करावी असे आवाहन प्राचार्यांनी केले आहे. शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालये असलेल्या ठिकाणी हे तांत्रिकचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे.

एकूण राज्यात हा अभ्यासक्रम ४३ ठिकाणी सुरू झाला आहे. त्यामध्ये साेलापुरातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालचा समावेश आहे. सोलापुरातील तत्रशिक्षण महाविद्यालयामध्ये एकूण ४१० जागा आहेत. त्या प्रत्येक कोर्सेसाठी तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. यासाठी इयत्ता ९ वी व १० वी पास गरजू विद्यार्थ्यांनी शासकीय तंत्रनिकेतनमध्ये आपली नावे नोंदवावीत. यामध्ये ग्रामीण भागातील मुलांना प्राधान्य देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण घेतल्यानंतर मुलं स्वत:चा उद्योग किंवा त्यांना तत्काळ रोजगार मिळण्यास मदत होणार आहे. ९वी १०वीच्या मुलांसाठी लॅम्प मेकिंग, मोटार रिवायडिंग, अॅटो इलेक्ट्रिशियन, ऑटो कॅड असे अभ्याससक्रम आहेत.

बातम्या आणखी आहेत...