आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्री रेवण सिद्धेेश्वर यात्रा:रथोत्सवात दिसला श्रद्धा अन् सेवेचा संगम; पाच हजार भक्तांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

साेलापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामदैवत श्री सिद्धेेश्वर महाराज यांचे गुरुवर्य रेवणसिद्धेेश्वर महाराज यात्रा श्रावण महिन्याच्या चारही रविवारी भरते. पालखी मिरवणुकीत महिलांचा तर सायंकाळी काढण्यात आलेल्या रथोत्सवात पुरुषांचा लक्षणीय सहभाग होता. दुपारी सुमारे पाच हजार भक्तांनी आणि गरजूंनी महाप्रसादाचा लाभ घेतला. जेवण वाढण्यापासून ते सर्व स्वच्छतेपर्यंत सर्व कामे तरुणांनी श्रद्धेने केली.

जोडभावी पेठ येथील रेवणसिध्देश्वर मंगल कार्यालय येथून पालखी मिरवणुकीस प्रारंभ झाला. मानकऱ्यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. यावेळी स्वामी मल्लिनाथ हुबळीमठ, याेगिनाथ हुबळीमठ आणि गिरीमल्लप्पा हिंगमिरे, सिध्देश्वर दुलंगे, अशाेक चाकाेते, मल्लिानाथ वारद, आशिष दुलंगे, गुरुराज पदमगाेंडा, सागर अतनुरे यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत महाआरती झाली. काॅँग्रेस भवनसमाेरील गुरू भेट मंदिर येथून रथ यात्रा काढण्यात आली. रथाेत्सव विजापूर वेस, जाेडभावी पेठमार्गे येऊन रेवण सिध्देश्वर मंगल कार्यालय येथे सांगता करण्यात आली. ऋषिकेश हिंगमिरे, लाेकेश हिरकशेट्टी, चिडगुंपी, मल्लिनाथ कलशेट्टी, याेगेश, चेतन अवटे, कैलास चाकाेते, केतन वारद, चिदानंद बगले आदीसह यात्रा कमिटीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

महाप्रसाद वाटप ते स्वच्छतेपर्यंतची कामे तरूणाईने केली स्वच्छेने
सिध्देश्वर महाराज यांचे वचन अंगीकारून आजची तरुण पिढी सेवा करत असल्याचे दिसून आले. श्रावण महिन्याच्या चारही रविवारी रेवण सिध्देश्वर मंदिरात महाप्रसाद वाटप केला जातो. रविवारी एक हजार ते दीड हजार जण या महाप्रसादाचा लाभ घेतात. शेवटच्या रविवारी साडेचार ते पाच हजार जणांनी लाभ घेतला. ही मानव सेवा आहे या विचार सरणीतून तरुण स्वेच्छेने महाप्रसाद वाटपापासून ते स्वच्छतेपर्यंत सर्व काम करत होते.

बातम्या आणखी आहेत...