आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसकडून आघाडीसाठी समिती स्थापन:ज्येष्ठ नेत्यांना मानाचे पान; तरुण नेत्यांच्या खांद्यावरही नाना पटोलेंकडून जबाबदारी

सोलापूर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी काेणत्या पक्षाबराेबर आघाडी करायची की नाही हे ठरविण्यासाठी काँग्रेसने राज्यपातळीवरील एक समितीत स्थापन केली असून त्याचे प्रमुख प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले असून त्यात माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशाेक चव्हाण आदींसह 11 जणांचा समावेश आहे, तर माणिकराव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली प्रशिक्षण व प्रबाेधन समिती तर आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ई प्रचार समितीत स्थापन करण्यात आली आहे. या सर्व समित्यांची घाेषणा पक्षातर्फे बुधवारी करण्यात आली.

शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीमुळे राज्यातील सत्तेतील महाविकास आघाडी सरकार काेसळले. त्यानंतर महाविकास आघाडी अस्तित्वात आहे की नाही याबाबत साशंकता आहे. त्यातच शिवसेनेतील फुटीर गटाबाबत अद्याप निर्यण झालेला नाही. त्यामुळे राजकीय संभ्रम आहे. अशा राजकीय स्थितीत काँग्रेसने आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका स्वबळावर लढवायच्या की आघाडी करायची या बाबत निर्णय घेण्यासाठी त्या त्या जिल्ह्यातील परिस्थिती जाणून घेवून निर्णय घेण्यासाठी समितीत स्थापन केली आहे. या समितीत प्रमुख म्हणून प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले, तर सदस्य म्हणून विधानसभेतील गटनेते बाळासाहेब थाेरात, माजी मुख्यमंत्री अशाेक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, नसीम खान, बसवराज पाटील, चंद्रकांत हांडाेरे, यशाेमती ठाकूर, संध्या सव्वालाखे, सुनील देशमुख आदींचा समावेश आहे. ही समिती समविचारी पक्षाबराेबर आघाडी करण्याबाबत तसेच पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न करेल. या समितीला राजकीय समिती असे नाव देण्यात आले आहे.

प्रशिक्षण व प्रबाेधन समितीत

काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांपर्यंत गांधी-नेहरू विचार धारा पाेहाेचविण्यासाठी राज्यभर प्रशिक्षण शिबीरे, वक्तृत्व स्पर्धा, निबंध, व्याख्याने आदी उपक्रम राबविण्यासाठीही समिती स्थापन केली आहे. या समितीचे प्रमुखे माणिकराव ठाकरे आहेत. तर सदस्यपदी कुणाल पाटील, अभिजीत वंजारी, रामहरी रुपनवर, याेगेंद्र पाटील, हरिष पवार, विनायक देशमुख, उत्कर्षा रुपवते, नंदा म्हात्रे, अमर खानापुरे, अमिर शेख, किशाेर जगभिए यांचा समावेश आहे.

ई प्रचार समिती प्रमुखपदी प्रणिती शिंदे

निवडणुकात काँग्रेस पक्षातर्फे राज्यस्तरावर पार्टल, साेशल मिडीयावरील प्रचार अशी यंत्रणा उभारली जाणार आहे. त्यासाठी ई प्रचार समितीत स्थापन केली असून त्याच्या प्रमुख पदाची जबाबदारी आमदार व कार्याध्यक्षा प्रणिती शिंदे यांच्यावर साेपविण्यात आली आहे. या समितीत सदस्य म्हणून माजी राज्यमंत्री सतेज पाटील, विश्वजीत कदम, अभिजीत सपकाळ, विशाल मुत्तेमवार यांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...