आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्वातंत्र्य पूर्व काळापासून आजपर्यंत काँग्रेस ही तळागाळातील वंचित घटकासाठी काम करत असून, यापुढेही गोरगरीब जनतेची कामे घेऊन या ती त्वरित पूर्ण केली जातील असे मत आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केले.
उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी, गुळवंची, सेवालालनगर येथे वसंतराव नाईक महामंडळ तांडा विकासच्या माध्यमातून मिळालेल्या २३ लाख रुपयांची कामे मंजूर झाली. गुळवंची तांडा येथे रस्ता काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. या वेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष शालिवाहन माने, सुरेश राठोड, संजय पौळ, सरपंच विष्णू भोसले, उपसरपंच सागर राठोड आदी उपस्थित होते आमदार शिंदे म्हणाल्या, एका दिवसात फक्त अदानी अंबानी यांना मोठे करण्याचे काम केंद्र सरकार करीत असून जनतेकडे दुर्लक्ष केले जात आहे. केंद्र सरकारने तरुणांना जॉबलेस केले.
या चुका सुधारण्यासाठी येणाऱ्या काळात काँग्रेसच्या मागे भक्कमपणे उभे रहा.आम्ही आपल्या हक्काचा निधी खेचून आणण्यास कमी पडणार नाही. यावेळी प्रवीण जाधव, सुधीर गोरे, सिद्राम सलवदे, सुभाष भोसले, दिनेश जगताप, त्रिंबक इंगळे, संजय खरटमल, लक्ष्मण राठोड, पृथ्वीराज राठोड, गोपाळ पवार, मोतीराम पवार, रमेश राठोड, पोपट पवार, बाबू राठोड, प्रभू राठोड, युवराज राठोड, संतोष पवार, यशवंत राठोड, अनिल राठोड, राजू चव्हाण, विक्रम चव्हाण उपस्थित होते. माजी आमदार दिलीप माने यांनी काँग्रेसचा त्याग केल्यानंतर तालुक्यातील पक्षाचा हा पहिलाच मोठा कार्यक्रम होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.