आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यपालांना हटवा:महापुरुषांचा अपमान करणाऱ्या भाजप नेत्यांवर कडक कायदेशीर कारवाई करा, काँग्रेसचे आंदोलन

सोलापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापुरुषांचा अपमान करणाऱ्या भाजप नेत्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी. भगतसिंग कोश्यारी यांना राज्यपाल पदावरुन ताबड़तोब हटविण्यात यावे. या मागणीसाठी सोलापुर शहर काँग्रेसच्या वतीने शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या नेतृत्वाखाली निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जोरजोरात घोषणाबाजी करत भाजपा नेत्यांचा निषेध केला यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणुन गेला.

यावेळी बोलताना शहर अध्यक्ष चेतन नरोटे म्हणाले की, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, भाजपा प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी, केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे, राज्यमंत्री मंगलप्रसाद लोढा, आमदार प्रसाद लाड या सारखे भाजपा नेते छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व इतर महापुरुषांबद्दल, महिलांबद्दल सतत अवमानकारक, वादग्रस्त बेताल वक्तव्ये करत आहेत.

भाजप नेत्यांकडून महापुरुषांच्या अपमानाची मालिकाच चालू आहे. परवा भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी औरंगाबाद मधील पैठण संतपीठ येथे कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतीबा फुले यांनी शाळा सुरु करण्याकरिता लोकांकडे भीक मागीतली असे वक्तव्य केले होते. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या. जनतेत मोठ्ठा असंतोष पसरला आहे.

फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांनी पावन झालेल्या महाराष्ट्रात असे दळभद्री भाजपा नेते सतत महापुरुषांचा अपमान करत आहेत याचा काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही तीव्र निषेध करतो. बहुजन समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी या थोर महापुरुषांनी आपल्याकडे जे होते ते सर्व दिले. लोकांकडून वर्गणी, देणगीच्या स्वरुपात पैसे जमा केले व शाळा उघडल्या. बहुजनांना शिक्षणाचा अधिकार मिळवून देण्यासाठी या महापुरुषांचा त्याग आणि कष्ट यांची तुलना अशक्यच आहे.

वर्णव्यवस्थेच्या जोखडात अडकलेल्या समाजाला, स्त्रियांना स्वातंत्र्य मिळवून देत शिक्षणाची दारे खुली करून दिली. ह्या महान कार्यासाठी त्यांनी ‘भीक’ मागितली असे म्हणून चंद्रकात पाटील यांनी महापुरुषांचाच नाही तर बहुजन समाजाचाही अपमान केला आहे. सातत्याने थोर महापुरुषांचा अवमानकारक वक्तव्ये करुन अपमान करणाऱ्या भाजपा नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर कड़क कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच याप्रकरणी चूकीची कारवाई करत अकरा पोलिसांना निलंबित करण्यात आले, तीन कार्यकर्त्यांसह एका पत्रकारावर गुन्हा दाखल करण्यात आली ही कारवाई ताबड़तोब मागे घ्यावी.

पुढे बोलताना चेतन नरोटे म्हणाले की, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व सावित्रीबाई फुले इतर महापुरुषांबद्दल सातत्याने वादग्रस्त व्यक्तव्ये करून अपमान करणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना राज्यपाल पदावरुन ताबड़तोब हटविण्यात यावे.

बातम्या आणखी आहेत...