आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापूरची घटना:आठ लाखांची लाच घेताना‎ एपीआयसह हवालदार अटकेत‎ ; गुन्हा दाखल न करण्यासाठी मागितले पैसे‎

कोल्हापूर‎11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी ८‎ लाखांची लाच घेताना पोलिस निरीक्षकासह‎ कॉन्स्टेबलला सांगली येथील एसीबीच्या‎ पथकाने रंगेहाथ अटक केली. नागेश म्हात्रे‎ असे लाचखोर सहायक पोलिस निरीक्षकाचे‎ नाव आहे, तर रूपेश कुंभार असे‎ कॉन्स्टेबलचे नाव आहे. विशेष म्हणजे पहाटे‎ अडीच वाजता एसीबीने ही कारवाई केली.‎ दोघेही कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलिस‎ ठाण्यात कार्यरत आहेत. दरम्यान, नागेश म्हात्रे‎ याची प्रकृती बिघडल्याने त्याला उपचारासाठी‎ सीपीआर येथे दाखल करण्यात आले आहे.‎ जुना राजवाडा पोलिस ठाण्यात तक्रारदार‎ आणि त्यांच्या आत्यांचा मुलगा यांच्यावर‎ फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी‎ म्हात्रे याने आठ लाख रुपयांची लाच‎ मागितली.

त्यानंतर तक्रारदाराने शुक्रवारी (१०‎ मार्च) सांगली येथील लाचलुचपत प्रतिबंधक‎ विभागाकडे तक्रार केली होती. पोलिसांनी‎ तक्रारदाराच्या अर्जाची खातरजमा केली‎ असता म्हात्रे याने लाच मागितल्याचे निष्पन्न‎ झाले. त्यानंतर एसीबीने सापळा रचून‎ शुक्रवारी मध्यरात्री एनसीसी भवन येथे आठ‎ लाख रुपयांची लाच घेताना म्हात्रे आणि‎ कुंभार यांना अटक केली. याप्रकरणी गुन्हा‎ दाखल करण्यात आला आहे.‎

बातम्या आणखी आहेत...