आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरक्षणामुळे झेडपीच्या मातब्बर नेतृत्वाला ब्रेक:नेते विजयराज डोंगरे, काका साठे, बाळराजे पाटील, आनंद तानवडे यांचे मतदारसंघ आरक्षित

सोलापूर11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर जिल्हा परिषदेचे आरक्षण सोडत गुरुवारी जाहिर झाले आहे. या आरक्षण निश्चितीमुळे जिल्हा परिषदेचे मातब्बर नेते विजयराज डोंगरे, काका साठे, बाळराजे पाटील, आनंद तानवडे यांचे मतदारसंघ आरक्षित झाले आहेत.

यामुळे त्यांना जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत जवळ असलेल्या उपरा मतदारसंघ नेतृत्वासाठी शोधण्याची वेळ आली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील सुरेश हसापूरे व अण्णाराव बाराचारे या दोन्ही नेत्यांना तालुक्यातच मतदारसंघ उरला नसल्याने त्यांच्या नेतृत्वाला पाच वर्षाचा ब्रेक लागला आहे.

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अनिरुध्द कांबळे यांचा केम मततदारसंघ आता सर्वसाधारण महिला साठी राखीव झाल्याने त्यांना अन्य मतदारसंघात निवडणूक लढवावी लागणार आहे. माजी उपाध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी भोसे येथून जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढविली होती.हा मतदारसंघ पुन्हा सर्वसाधारण झाल्याने त्यांना पुन्हा एकदा निवडणूक लढविण्याची संधी आली आहे. अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती विजयराज डोंगरे यांनी मोहोळ तालुक्यातील आष्टी जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढविली होती.

या ठिकाणी एस.सी महिला आरक्षण पडल्याने डोंगरे यांना दुसरा गट शोधावा लागणार आहे.मोहोळ तालुक्यात केवळ पेनूर हा एकच गट सर्वसाधारण असल्याने या मतदारसंघातूनच झेडपीचे माजी पदाधिकारी बाळराजे पाटील, उमेश पाटील यांनाही पेनूर गट नेतृत्वासाठी खुणावित आहे.

माजी कृषी सभापती अनिल मोटे यांनी सांगोला तालुक्यातील घेरडी जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढविली होती. यावेळी तेथे पुन्हा सर्वसाधारण आरक्षण पडले आहे. त्यामुळे मोटे यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता . माजी समाजकल्याण सभापती संगिता धांडोरे यांनी सांगोला तालुक्यातील कडलास येथून निवडणूक लढविली होती. आता त्या ठिकाणी ओबीसी महिला आरक्षण झाल्याने त्यांना तेथून निवडणूक लढविण्याची संधी मिळणार नाही. महिला बालकल्याण समितीचे माजी सभापती स्वाती शटगार यांनी अक्कलकोट तालुक्यातील सलगर गटातून निवडणूक लढविल्या होत्या. आता त्या ठिकाणी सर्वसाधारण आरक्षण असल्याने त्यांना पुन्हा संधी आहे.मात्र या मतदारसंघात मोठी चुरस असणार आहे.

जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेता बळीराम साठे आणि माजी पक्षनेते आण्णाराव बाराचारे यांच्या ही गटातील आरक्षण बदलेले आहे. या दोन्ही नेत्यांचा जुना मतदारसंघ सर्वसाधारण महिला साठी राखीव झाले आहेत. साठे यांना कोंडी जि.प.गट नेतृत्वासाठी खुणावत आहे तर बाराचारी यांना तालुक्यातच मतदारसंघ नसल्याचे दिसून येत आहे. जिल्हा परिषदेतील मातब्बर सदस्य म्हणून गणले जाणारे अक्कलकोट तालुक्यातील जेउर जि.प.गटाचे माजी सदस्य मल्लिकार्जून पाटील, सलगर गटाचे आनंद तानवडे, सांंगोला तालुक्यातील सचिन देशमुख आदी नेत्यांच्या गटात महिला आरक्षण पडल्यामुळे त्यांची गोची निर्माण झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...