आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील बक्षीहिप्परगे येथील परिवर्तन मंडळ यंदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साधेपणाने साजरी करणार आहे. जयंतीनिमित्त जमणाऱ्या लोकवर्गणीतून संविधान स्तंभ उभारण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती ग्रामपंचायत सदस्य व मंडळाचे प्रमुख विश्रांत गायकवाड यांनी दिली.
या गावचे लोकनेते डी. एन. गायकवाड यांचे गेल्या वर्षी २३ मार्चला कोरोनामुळे निधन झाले होते. त्यामुळे यावर्षी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेची पूजा करून जयंतीनिमित्त मिरवणूक न काढण्याचा निर्णय कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला. विश्रांत गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली परिवर्तन मंडळाची बैठक झाली. या मंडळाने जयंतीनिमित्त राजमुद्रा असलेला १८ फूट उंचीचा संविधानस्तंभ उभारण्याचा घेतलेला निर्णय आदर्शवत व इतर मंडळांना प्रेरणा देणारा आहे. याशिवाय येथे डी. एन. गायकवाड यांचा पूर्णाकृती पुतळा असलेले स्मारक उभारण्याचे काम सध्या सुरू आहे.
या बैठकीस स्वप्निल गायकवाड, सिद्धार्थ तडसरे, बाळासाहेब गायकवाड, शांतकुमार गायकवाड, रमेश शिवशरण, तम्मा दुपारगुडे, विश्वास निकंबे, भीमा गायकवाड, सुहास गायकवाड, दीपक सलवदे, राजू म्हस्के, उमाकांत सरवदे, किरण मेंढापुरे, श्रीकांत गायकवाड, राजू गायकवाड, राम सलवदे, अनिल शिवशरण, जयानंद कांबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. दक्षिण सोलापूर तालुक्यातील बक्षीहिप्परगे येथे परिवर्तन मंडळाच्या वतीने कोरोनापूर्व काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम घेण्यात आले आहेत.
संग्रहित छायाचित्र
१८ फुटी संविधानस्तंभ असेल, १४ एप्रिलला भूमिपूजन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जमणाऱ्या रकमेतून वणंदनगर येथे राजमुद्रा असलेला १८ फूट उंचीचा संविधानस्तंभ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. याचे भूमिपूजन १४ एप्रिल रोजी करण्यात येणार आहे. याशिवाय गावातील जनतेसाठी आरोग्य शिबिर ठेवण्यात येणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे मंडळ परिवर्तन व्याख्यानमाला घेते. या मंडळाचे आधारस्तंभ डी. एन. गायकवाड यांच्या निधनाने यंदा प्रथमच साधेपणाने जयंती होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.