आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:बांधकाम विभाग ; अभियंत्याची आत्महत्या

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बांधकाम विभागातील स्थापत्य अभियंता सहायकाने अज्ञात कारणावरून माेहाेळमधील राहत्या घरी पंख्याला वायरने गळफास घेऊन शनिवारी आत्महत्या केली. सुहास रमेश काटकर (वय ४०) असे मृताचे नाव आहे. शनिवारी सकाळी १० वाजता ही घटना उघडकीस आली.

सुहास रमेश काटकर (रा. विडी घरकुल साेलापूर) हे बांधकाम विभागात आठ वर्षांपासून नोकरीस आहेत. ते सध्या स्थापत्य अभियंता सहायक पदावर जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग मोहोळ येथे कार्यरत होते. ते पत्नी व लहान मुलांसह मोहोळ येथे वास्तव्यास होते

. त्यांची पत्नी माहेरी गेली होती. त्यामुळे घरी सुहास काटकर हे एकटेच होते. शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान त्यांनी अज्ञात कारणावरून मोहोळ येथील भाडयाचे रहाते घरी खोलीत असलेल्या पंख्याला वायरच्या सहायाने गळफास घेऊन आत्महत्या केली. अधिक तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल मालती नागरे करीत आहेत. मृत सुहास काटकर यांच्या मागे आई-वडील, पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे.

बातम्या आणखी आहेत...