आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चांगली सेवा मिळावी म्हणून निर्णय:पालिकेत बांधकाम परवाना आता दोन्ही पद्धतीने मिळणार

सोलापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिका बांधकाम परवाना विभागातून आता आॅटो डीसीआर आणि बीपीएमएस या दोन्ही पद्धतीने बांधकाम परवाना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबतचा निर्णय शासनाने १७ आॅगस्ट रोजी घेतला आहे. महापालिका बांधकाम परवाना विभागात यापूर्वी आॅटो डीसीआर पद्धतीने परवाना देण्यात येत असे. सहा महिन्यांपूर्वी ती पद्धत बंद करून बीपीएमएस सुरू केली. याचा मक्ता एका कंपनीस दिला होता. यात स्पर्धा निर्माण व्हावी आणि चांगली सेवा मिळावी यासाठी शासनाने बीपीएमएससोबत आॅटो डीसीआर पद्धतीलाही परवानगी दिली आहे.

महाआयटीमार्फत बीपीएमएस प्रणाली होती. साॅफ्ट टेक कंपनीची आॅटो डीसीआर प्रणाली आहे. दोन्हीत विकास शुल्क सारखे असेल. बांधकाम परवानगी ज्या पद्धतीने सादर केले त्याच पद्धतीने घ्यावे, त्यात अचानक बदल करता येणार नाही, असे शासन आदेशात नमूद आहे.

बातम्या आणखी आहेत...