आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहापुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्यांचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी दुपारी दाेनपर्यंत साेलापूर शहर बंदची हाक देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही, याची दक्षता घेण्यासाठी पाेलिस यंत्रणेने संवेदनशील भागात दंगा नियंत्रण वाहने आणि पथके तैनात केली आहेत.‘शाळा बंद’बाबत संदिग्ध भूमिका आहे. संस्थाचालकांनी पालकांच्या जबाबदारीवर मुलांना साेडण्यास सांगितले आहे.
खासगी शाळांनी दुपारी अडीचला शाळा सुरू करण्याचे ठरवले. परंतु, स्कूल बसचालकांनी बंद पुकारला आहे. काही रिक्षा संघटनाही आहेत. त्यामुळे पालकांची धावपळ हाेईल. यंत्रमागधारक संघानेही बंदबाबत कुठलीही भूमिका घेतलेली नाही. ज्या कारखानदाराला बंद ठेवणे आवश्यक वाटेल ते कारखाने बंद असतील, असे संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम म्हणाले. विडी कारखाने मात्र बंद राहतील.
शहरात असेल तगडा बंदाेबस्त
1 संवेदनशील भागात फिक्स पॉइंट आणि सातत्याने गस्त आणि विशेष पथके.
2 साध्या वेशातील पोलिस बंदोबस्त. जमावाच्या हालचाली टिपणार.
3 पेट्रोलिंगसाठी १६ अधिकारी, ४० कर्मचारी, फिक्स पॉइंटवर १० अधिकारी.
4 सात विशेष पथकांमध्ये एक अधिकारी आणि १५ कर्मचारी असतील.
5 शहरभरातील चित्र टिपण्यासाठी १२ व्हिडिओ कॅमेरेदेखील फिरतील.
बंदच्या मुद्द्यावर राजकीय पक्ष आमने सामने, पोलिस यंत्रणा सतर्क
शिवजन्माेत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या झेंड्याखाली उद्धव ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि माकप या राजकीय पक्षांसह काही संघटना एकत्र आल्या. बंदची हाक दिली. त्यांच्या विराेधात बाळासाहेबांची शिवसेना, भाजप आणि मनसे हे तिन्ही पक्ष एकवटले. त्यांनी शहर बंदला िवराेध केला. सहभागी हाेऊ नये, असे आवाहन केले. पाेलिस आयुक्त राजेंद्र माने यांनी बैठका घेऊन अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या. चोख बंदाेबस्ताची रचना केली.
जबरदस्ती करू नका
बंदमध्ये सहभागासाठी कुणालाही बळजबरी करता येणार नाही. तशा तक्रारी आल्यास संबंधितांवर त्वरित कायदेशीर कारवाई हाेईल. कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही, याची दक्षता घेण्यात येत आहे. नागरिकांनी त्यासाठी पाेलिस यंत्रणेला सहकार्य करावे. - विजय कबाडे, पाेलिस उपायुक्त
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.