आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिर्याद दाखल:अल्पभाषिक मान्यतेचा वाद, जिल्हा समाजसेवा‎ मंडळाच्या संचालकांच्या चौकशीचे आदेश‎

सोलापूर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा समाजसेवा मंडळ, सोलापूर या‎ संस्थेच्या संचालक मंडळांची चौकशी करून‎ त्यांच्यावर तपास करून पुढील कार्यवाही करावी,‎ असा आदेश न्यायदंडाधिकारी एस. पी. पाटील‎ यांनी जारी केला आहे. संस्थेचे माजी सचिव नागेश‎ बिराजदार (सैफुल) यांनी शाळा अल्पभाषिक‎ दाखवून शिक्षक भरती केल्यासंदर्भात न्यायालयात‎ खासगी फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार मंदूप‎ पोलिसांना हे आदेश दिले आहेत.‎

संस्थेचे अध्यक्ष पुंडलिक (प्रकाश) लायप्पा‎ कोळी (माशाळ वस्ती), चनगोंडा गुरुसिदप्पा‎ हविनाळे (संस्था उपाध्यक्ष - रा. बरूर), विठ्ठल‎ कामगोंडा पाटील (खजिनदार- रा. भंडारकवठे),‎ महादेव धरेप्पा कमळे (सचिव- भंडारकवठे),‎ बुरहाणद्दीन अमीनसाब जमादार (संचालक -‎ सोलापूर), सलप्पा अंकलगी (संचालक-‎ सैफुल), तुकाराम कोळी (संचालक-लवंगी),‎ संदेश कोळी (संचालक), रचना कोळी‎ (संचालक), उमाकांत बापूराव डांगे (‎ संचालक), लकण्णा सोमणा कोळी (सैफुल),‎ बसवंत महादेव भरले (भंडारकवडे), काशिनाथ‎ नामदेव कोळी (हत्तूर), भारती पुंडलीक कोळी‎ (संचालक - माशाळ वस्ती) यांच्याविरोधात‎ खाजगी फिर्याद दाखल केली होती.‎

आम्ही काही चुकीचे काम केले नाही‎ आम्ही काही चुकीचे काम केले नाही. आम्ही महाराष्ट्र- कर्नाटक‎ सिमावर्ती भागात राहतो. आम्हाला कानडी बोलता येते. याबाबत‎ शासनाकडे प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्यानुसार लेखी आदेश‎ मिळाले, ती माहिती मुख्याध्यापकांना दिली होती. आमची भाषा‎ कानडी आहे. सगळे नियमानुसारच केले. आम्ही न्यायालयात‎ बाजू मांडू, अशी माहिती विठ्ठल पाटील आणि महादेव कमळे‎ यांनी दिली.‎

बातम्या आणखी आहेत...