आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यक्तीने फसवले:हॉटेलमध्ये जेवण घालत 80 हजारांची कोथिंबीर पळवली

सोलापूर8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिन्नूर, दापूर (जिल्हा नाशिक) येथील एक शेतकरी कोथिंबीर विक्रीसाठी सोलापुरातील बाजार समितीमध्ये आले होते. गुलबर्गा येथील एका व्यक्तीने कोथिंबीर विकत घेतो, असे म्हणून त्यास जेवणासाठी हॉटेलमध्ये नेले, त्या दरम्यान ८० हजार रुपयांची कोथिंबीर घेऊन पैसे न देताच फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. विलास रामनाथ आव्हाड (रा. दापूर, सिन्नर) यांनी जोडभावीपेठ पोलिसांत शुक्रवारी (दि.२३) फिर्याद दिली आहे. हा प्रकार ता. १९ रोजी बाजार समिती परिसरात घडला होता. अमर बागवान (रा. गुलबर्गा) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

नाशिक जिल्ह्यातील शेतकरी विलास आव्हाड यांच्या शेतातील १५० कॅरेट कोथिंबीर घेऊन त्यांचा पुतण्या सतीश आव्हाड व सतीश मुचकुले हे सोलापुरात आले होते. त्या दोघांची अमर बागवान याने भेट घेऊन कोथिंबीरचे ८० हजार रुपये देतो म्हणून त्यांना गाडीसह बाजार समिती जवळील हॉटेलमध्ये जेवायला घेऊन गेला. त्यानंतर त्यांच्या गाडीतून परस्पर कोथिंबीरचे कॅरेट काढून घेतले, त्याचे ८० हजार रुपये न देता आर्थिक फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक जाधव तपास करीत आहेत.