आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
आषाढीनंतर अाता कार्तिकी वारीलाही काेराेना संसर्गाचा फटका बसला असून २५ व २६ नोव्हेंबर या दोन्ही दिवशी पंढरपूर शहरासह ११ गावांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. २६ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी सोहळ्यादिवशी एकाही पालखीला पंढरपुरात प्रवेश मिळणार नाही. पाद्यपूजा, नित्यपूजा व शासकीय महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यास आयोगाने परवानगी दिली आहे. २१ नोव्हेंबर ते १ डिसेंबरपर्यंत चंद्रभागेत भाविकांना स्नान करण्यास बंदी घालण्यात अाली अाहे.
साेलापूरच्या ग्रामीण भागात अजूनही काही प्रमाणात काेराेनाचा प्रादुर्भाव अाहे. त्यामुळे अाषाढी वारीप्रमाणेच या वेळीही बरेच निर्बंध प्रशासनाने घातले अाहेत. शासनाच्या अादेशाप्रमाणे काही निर्णय जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी शुक्रवारी रात्री पत्रकार परिषदेत जाहीर केले. त्यानुसार पंढरपुरात संचारबंदी असणार अाहे.
पंढरपूर ते आळंदी प्रवास बसने... : श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यासाठी श्री पांडुरंग, श्री संत पुंडलिक व श्री संत नामदेव महाराज यांचे पालखी सोहळे पंढरपूर येथून आळंदीस नेणे व परत आणण्यास परवानगी देण्यात आली आहे. एका पालखी सोहळ्यात २० जणांना परवानगी असणार आहे. ११ डिसेंबर रोजी आळंदीस पोहोचतील व १३ डिसेंबर रोजी परत पंढरपूर येथे दाखल होतील. पंढरपूर ते आळंदी हा प्रवास राज्य परिवहन महामंडळाच्या बसने करण्यास परवानगी असून बस उपलब्ध करून देण्यासाठी मंदिर समिती नियोजन करणार असल्याचे आदेशात नमूद केले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते होणार शासकीय महापूजा
विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता असली तरी आयोगाने आचारसंहितेचा भंग होणार नाही, या अटीवर उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा करण्यास परवानगी दिली आहे. शासकीय वाहने वापरणे, शासकीय विश्रामगृह वापरणे, पूजेच्या काळात कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रचार होणार नाही व भेटी देता येणार नाहीत, शासकीय पूजा असल्याने पालकमंत्री, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना हजर राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. मंदिर समितीकडून निवडण्यात आलेल्या मानाच्या वारकऱ्यांचा सत्कार करण्यास परवानगी असणार आहे.
तीन स्तरीय पाेलिस बंदाेबस्त
अतिरिक्त जिल्हा पोलिस प्रमुख झेंडे यांनी सांगितले की, सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत गर्दीमुळे कोरोनाचा अधिक प्रसार हाेऊ नये म्हणून कार्तिकी यात्रा प्रतीकात्मक स्वरूपात साजरी व्हावी यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. १८०० पोलिसांचा त्रिस्तरीय बंदोबस्त पंढरपूर शहरासह जिल्हाभरात लावण्यात येणार आहे. याशिवाय पंढरपूरकडे येणाऱ्या मार्गावर नाकेबंदी करण्यात येणार अाहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.