आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना:शहरात कोरोना रुग्ण शून्य; ग्रामीण भागात 20 बाधित

सोलापूर2 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

कोरोना संसर्ग कमी होत असून, बुधवारी महापालिकेकडून मिळालेल्या अहवालानुसार शहरात एकही नवीन कोरोना रुग्ण आढळला नाही. तसेच, सक्रिय रुग्णाची संख्या शून्यावर आली आहे. ग्रामीण भागातही कोरोना झपाट्याने ओसरत आहे. बुधवारी दोन नव्याने रुग्ण मिळून आले. २० जणांवर उपचार सुरू आहे. ग्रामीणमध्ये अक्कलकोट, उत्तर व दक्षिण सोलापूर तालुक्यांत एकही रुग्ण नव्याने तसेच सक्रिय नाही.

मंगळवारपर्यत शहरात तीन काेराेना रुग्णांवर उपचार सुरू हाेते, त्यांनाही डिसचार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे क्वारंटाइनमध्ये उपचार घेणाऱ्यांची संख्या शून्यावर आली आहे. बुधवारी प्राप्त अहवालात नवीन एकही रुग्ण मिळून आला नाही. त्यामुळे कोरोना संसर्ग सुरू झाल्यापासून सक्रिय रुग्णसंख्या शून्यावर येण्याची ही पहिली वेळ आहे. शहरात रुग्णसंख्या कमी झाल्याने आगामी काळात कोरोना निर्बंधात शिथिलता येण्याची शक्यता आहे. कोरोना रुग्ण नसले तरी आरोग्य विभागातर्फे सतर्कता असून, लसीकरणावर भर देण्यात आल्याची माहिती पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.

ग्रामीण भागात संसर्ग कमी झाला असून, बुधवारी दोन नवीन कोराेना रुग्ण सांगोला तालुक्यात मिळून आले. जिल्ह्यात फक्त २० रुग्ण सक्रिय आहेत. अक्कलकोट, दक्षिण व उत्तर सोलापूर तालुक्यांत एकही रुग्ण नाही. मोहोळ तालुकामध्ये सर्वाधिक पाच रुग्ण तर बार्शी, करमाळा, माळशिरस तालुक्यांत प्रत्येकी एक रुग्ण आहे. माढा ४, मोहोळ ५, पंढरपूर व सांगोला तालुक्यांत प्रत्येकी तीन रुग्ण सक्रिय आहेत.

बातम्या आणखी आहेत...