आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Solapur
  • Corona Patients Are Treated In The Hospital Premises Without A Bed In Sangli, Admission To A Private Hospital Is Immediately Available After Paying Rs 1 Lakh

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुर्दशा:सांगलीत बेडविना रुग्णालयाच्या आवारातच कोरोना रुग्णांवर उपचार, एक ते दीड लाख भरल्यानंतर खासगी रुग्णालयात लगेच मिळतो प्रवेश

गणेश जोशी | सांगली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अपुरी व्यवस्था, मात्र मार्ग काढू : जिल्हाधिकारी

सांगली शहरात कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी खासगी व शासकीय रुग्णालयात २२०० बेड उपलब्ध करण्यात आल्याचा दावा जिल्हा प्रशासन करत आहे. मात्र, गेल्या ४ ते ५ दिवसांत सर्वसामान्य कोरोना रुग्णांना बेड उपलब्ध नाहीत. यामुळे रुग्णालयाच्या आवारातच त्यांना मृत्यूला सामोरे जावे लागले आहे, तर दुसरीकडे १ ते दीड लाख रुपये जमा करून काही रुग्णांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात येते, अशी विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे.

जिल्हा प्रशासनाच्या वतीने शहरातील विविध रुग्णालयांची यादी जाहीर केली आहे. मात्र, सर्वसामान्य कोरोनाचा रुग्णवाहिकेतून या रुग्णालयात फेऱ्या घालतो त्या वेळी ही सर्व रुग्णालये ‘हाऊसफुल्ल’ असल्याचे कारण दाखवत कोरोना रुग्णांना दाखल करून घेत नाहीत. मात्र, या रुग्णांनी उपचारासाठी एक लाखाहून अधिक रक्कम जमा करण्याचे मान्य केल्यानंतर अशा रुग्णांना केवळ बेडच मिळतो असे नव्हे तर त्यांना तातडीने ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटरची सुविधाही पुरवली जाते. दुसरीकडे ज्या रुग्णांची आर्थिक ताकद नाही अशा रुग्णांना वेगवेगळ्या हॉस्पिटलचे उंबरठे झिजविण्यापलीकडे काहीही साध्य होत नाही. शासकीय रुग्णालयेही अशा गरीब रुग्णांच्या मदतीला धावून जात नाही.

कोरोनाचा संसर्ग आता समूह पद्धतीने सुरू झाल्याने शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येचा ताण प्रशासकीय यंत्रणेसह आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात पडला आहे. शहरातील सुमारे २५ खासगी रुग्णालये शासनाने अधिकृत केली असली तरीही या रुग्णालयांवर नियंत्रण मात्र प्रशासनाचे नाही. खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची बिलाची तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असले तरीही ही रुग्णालये रुग्णाला प्रथम दाखल करून घेत असताना घेतलेल्या पैशांचा हिशेब या बिलात दाखवत नाहीत. रुग्णही आपण बरे झालो आहोत. त्यामुळे आपल्या मागे अथवा डॉक्टरमागे झंझट लागू नये म्हणून तक्रारही दाखल करत नाहीत.

अपुरी व्यवस्था, मात्र मार्ग काढू : जिल्हाधिकारी

सांगलीत एकूण रुग्णसंख्या १६ हजारांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे अपुरी व्यवस्था निर्माण झाली आहे. यातून मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यामध्ये मृत्युदर कमी करण्याचे आव्हान आहे. यासाठी प्रशासन दक्ष आहे, असे सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी सांगितले.