आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआमदार बबनराव शिंदे यांच्या गावातच मागील 10 दिवसांपासून कोरोनाने शिरकाव केला असून, आज अखेर 21 कोरोनाबाधित रुग्ण गावात आढळल्याने खळबळ माजली आहे. तालुका वैद्यकिय अधिकारी डाॅ.शिवाजी थोरात यांनी याबाबत माहिती दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, आमदार बबन शिंदे यांच्या परिवारातील सर्व सदस्यांची कोरोना चाचणी घेण्यात असुन एक सदस्य बाधित निघाल्याची माहिती वैद्यकिय विभागाकडुन देण्यात आली आहे. स्वतः शिंदे निगेटीव्ह आले आहेत. गुरुवारी देखील गावातील नागरिकांच्या चाचण्या घेण्यात आल्या असुन त्याचे कोरोना अहवाल आलेले नाहीत. गावासह तालुक्यातील जनतेने स्वतह:सह कुटुंबाची काळजी घेऊन मास्क,सॅनिटायजरचा वापर करत आवश्यक ती खबरदारी घ्यावी अशी प्रतिक्रिया आमदार बबनराव शिंदे यांनी दिव्य मराठीशी बोलताना दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.