आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सांगलीतील धक्कादायक प्रकार:कोरोना चाचणी पॉझिटिव्ह की निगेटिव्ह, गर्भवतीचा जीव टांगणीला; बुधवारी महिलेने दिला मुलीला जन्म

सांगली5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अखेर खासगी प्रयोगशाळेचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर तिला खासगी रुग्णालयात दाखल

कोरोना चाचणी पॉझिटिव्ह की निगेटिव्ह याचा घोळ दिवसभर सुरू होता. या घोळात एका गर्भवती महिलेचा जीव टांगणीला लागला होता. अखेर खासगी प्रयोगशाळेचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दिवसभर या महिलेचे कुटुंब तणावात होते. सकाळी या महिलेची प्रसूती झाली आणि या कुटुंबाने सुटकेचा नि:श्‍वास सोडला.

शहरातील गर्भवती महिलेला सोमवारी सकाळी नऊ वाजता प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल करण्याची तयारी कुटुंबीयांनी केली. तिला खासगी रुग्णालयात नेण्यात आले. पण डॉक्टरांनी कोरोना चाचणी करण्यास सांगितले. या कुटुंबाने नगरसेवक चव्हाण यांच्याशी संपर्क साधला. चव्हाण यांनी अँटिजन चाचणीस महिलेला महापालिकेच्या रुग्णालयात नेले. तिथे अँटिजन चाचणी पॉझिटिव्ह आली. गर्भवती महिलेला कोरोना झाल्याचे समजताच तिच्या कुटुंबीयांना रडू कोसळले. दरम्यान, सांगली शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने उद्रेक झाला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी अिभजित चौधरी यांनी १० दिवसांचा जनता कर्फ्यू घोषित केला आहे. मात्र, नागरिक, उद्योजक आणि व्यापाऱ्यांचा या कर्फ्यूला विरोध आहे. त्यामुळे प्रभावी उपाययोजना राबवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. मात्र, प्रशासन काही ऐकण्याच्या तयारीत दिसत नाही.

खासगी प्रयाेगशाळेत अहवाल निगेटिव्ह

चव्हाण यांनी कुटुंबीयांना धीर देत खासगी प्रयोगशाळेमध्ये चाचणीचा सल्ला दिला. सायंकाळी महिलेचा स्वॅब खासगी लॅबकडे देण्यात आला. त्याचा अहवाल मंगळवारी सकाळी आला. तो निगेटिव्ह होता. हा अहवाल घेऊन कुटुंबीयांनी प्रसूतीसाठी तिला खासगी रुग्णालयात दाखल केले. सकाळी तिने एका मुलीला जन्म दिला. आता अँटिजन चाचणी खरी की लॅबची चाचणी, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser