आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोटिसा:उड्डाण पुलामुळे बाधित होणाऱ्यांना मनपाकडून नवीन गाळ्यांचा पर्याय ; विक्रेत्यांना जागा खाली करण्याच्या नोटिसा

सोलापूर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उड्डाणपुलामुळे बाधित होणाऱ्या मिळकतदारांनी ‘आरसीसी’ योजनेला नकार देत पैसेच हवेत, अशी मागणी केली आहे. यावर मनपा आयुक्तांनी पेड टीडीआर तसेच मनपाचे नवीन गाळे घेण्याचा पर्याय बाधितांना सुचविला आहे. जुना पुणे नाका ते विजापूर रोड तसेच जुना बोरामणी नाका ते विजापूर रोड असे दोन उड्डाणपूल होणार आहेत. यापैकी पहिल्या पुलामुळे बाधित होणाऱ्या ७७ पैकी ३५ मिळकतीचे मूल्यांकन झाले आहे. जुना बोरामणी नाका ते विजापूर नाका (पत्रकार भवन) पुलामुळे बाधित होणाऱ्यांना मनपाने नोटिसा बजाविल्या आहेत. अशा बाधितांची टप्प्याटप्प्याने सुनावणी घेण्यात येत आहे, असे मनपाचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी सांगितले. मनपाने बाधितांना मोबदला ‘आरसीसी’ योजनेच्या स्वरूपात देण्याचा मनपाचा प्रस्ताव आहे. मात्र, हा प्रस्ताव बाधितांना मान्य नाही. त्यांना पैसेच हवेत. यावर आयुक्तांनी टीडीआर तसेच मनपातर्फे जुना पुणे नाका येथील नियोजित फूड पार्क तसेच बेगम पेठ व पाच्छा पेठ येथे बांधण्यात येणारे नवीन गाळे घेण्याचा पर्याय बाधितांना दिला आहे.

पार्क चौपाटी पार्किंगसाठी पार्क चौपाटीची जागा पार्किंगसाठी उपलब्ध केली जाणार आहे. त्याठिकाणच्या खाद्य पदार्थ विक्रेत्यांना जागा खाली करण्याच्या नोटिसा दिल्या होत्या. यासंदर्भात सुनावणीची प्रक्रिया सुरू आहे. सोमवारी विक्रेते अंतिम युक्तिवाद करणार आहेत. होम मैदानालगतची पर्यायी जागा घेण्यास विक्रेत्यांनी नकार दिला आहे. लोक हिताच्या दृष्टीने निर्णय घ्यावा लागेल, असे आयुक्त म्हणाले.

कोरोना चाचणींची सूचना कोरोनाच्या अनुषंगाने खबरदारी घेत प्रत्येक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांना दैनंदिन ३० ते ४० संशयितांचा टेस्टिंग करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. तसेच प्रत्येक आरोग्य केंद्राच्या परिसरातील दवाखान्यांत संशयित आल्यास आरोग्य विभागास कळवावे. तसेच बाधितांची संख्या वाढल्यास योग्य ते नियोजन करून ठेवण्यात आल्याचे आयुक्तांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...