आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:नगरसेविका फिरदोस पटेल यांचा कॉँग्रेस श्रेष्ठींकडून सत्कार

सोलापूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेस पक्षाच्या वतीने डिजिटल मेंबरशिप नोंदणी अभियान सुरू करण्यात आले होते. संपूर्ण महाराष्ट्रात ही मोहीम राबविण्यात आली होती. यामध्ये महाराष्ट्रात सोलापुरातील नगरसेविका फिरदोस पटेल यांनी सर्वाधिक नोंदणी करून अव्वल क्रमांक पटकाविला. त्यामुळे यांचा मुंबई दादर येथील टिळक भवनमध्ये माजी केंद्रित मंत्री महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे निवडणूक निर्णय अधिकारी पल्लम राजू यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

प्रथम येताच काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ऑनलाइन अभिनंदन केले होते.