आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आत्महत्या:प्रेम प्रकरणाची माहिती कुटुंबाला समजेल या भीतीपोटी प्रेमीयुगुलाची गळफास घेऊन आत्महत्या

मोहोळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षण घेणाऱ्या प्रेमीयुगुलाने आपल्या प्रेम प्रकरणाची माहिती कुटुंबाला समजेल या भीतीपोटी व आलेल्या नैराश्यातुन लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना नरखेड (ता. मोहोळ) येथे (दि 17) रोजी सकाळी उघडकीस आली. प्रशांत रविंद्र शिंदे व प्रतिक्षा समीर शिंदे अशी मृतांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, प्रशांत रविंद्र शिंदे (वय 19) याच्या आई-वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे. त्याचे पुण्यातील एका संस्थेत बारावीचे शिक्षण झाले होते. लॉकडाउनच्या काळामुळे तो नरखेड येथील आजी-आजोबांकडे राहण्यासाठी आला होता. प्रतिक्षा समीर शिंदे (वय 14) हि 10वीत होती. दोघांचे दरम्यान प्रेम प्रकरण होते. या प्रेमप्रकरणाची माहिती कुटुंबीयांना मिळेल या भीतीतुन (दि. 148) रोजी रात्री दोघेही घरातून निघून गेले आणि पहाटे तीनच्या सुमारास नरखेड येथील बाळासाहेब पाटील यांच्या शेतातील बांधावरील एका लिंबाच्या झाडाला दोन वेगवेगळ्या फांदीला मुलाने ओढणीच्या सहाय्याने तर मुलीने दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक संतोष इंगळे व आशुतोष चव्हाण यांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला. दोघांचे प्रेत शवविच्छेदनासाठी मोहोळ ग्रामीण रुग्णालयत आणले. या प्रकरणी नरखेडचे पोलिस पाटील अरुण पाटील यांनी पोलिस ठाण्यात खबर दिली असून त्यानुसार आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक संतोष इंगळे हे करीत आहे.