आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:दुष्कर्मातून सात महिन्यांची गर्भवती राहिलेल्या चौदा वर्षीय मुलीला न्यायालयाकडून गर्भपाताची परवानगी

सोलापूर8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापुरातील एका १४ वर्षीय मुलीसोबत (वीणा- नाव बदलले आहे) दुष्कर्माची घटना घडली. ती ७ महिन्यांची गरोदर राहिली, वय लहान असल्यामुळे आणि लग्नाअगोदर गर्भधारणा झाल्यामुळे गर्भपातासाठी शासकीय रुग्णालयात धाव घेतली. पण ५ महिने झाल्यामुळे कायदेशीर बाबीने गर्भपाताचा सल्ला दिला. पालकांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाची मदत घेतली आणि मुंबई उच्च न्यायालयाने गर्भपातासाठी परवानगी दिली. विनामूल्य ही प्रक्रिया पार पडली. गर्भपातानंतर तिची तब्येत सुखरूप आहे.

लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणाने तिच्यासोबत दुष्कर्म केले. पोलिसांत गुन्हा दाखल आहे. मुलीला मासिक पाळी न आल्यामुळे आईच्या मनात शंका आली, शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेल्यानंतर ती गरोदर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. वय लहान असल्याने गर्भधारणा नको होती. नियमानुसार ५ महिन्यांच्या आतच गर्भपात करण्यात येतो. त्यापुढे दिवस गेल्यामुळे न्यायालयाची परवानगी घ्यावी लागते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणात १६ एप्रिल रोजी मुलीसह पालकांनी अर्ज सादर केला. हे प्रकरण उच्च न्यायालयात दाखल केले. शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणीचा अहवाल सादर केल्यानंतर उच्च न्यायालयाने ३ दिवसांनंतर गर्भपातासाठी परवानगी दिली. २९ एप्रिल रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला, तिची तब्येत आता ठीक आहे.

मुलाशी संवाद साधा :जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे रिटेनर लाॅयर अॅड. देवयानी किणगी म्हणाल्या, शेजारी, नातेवाईक व अनोळखी व्यक्तींशी मुलांनी कसे वागावे. त्यांच्यासोबत कसे बोलावे याची माहिती द्या. त्यांच्याशी मुक्तपणे संवाद साधा. लैंगिक शोषण म्हणजे काय ? याबाबत माहिती द्यावी, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

सोलापुरात ५ महिलांना गर्भपाताची परवानगी
सोलापुरात ५ जुलै २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या कालावधीत ५ महिलांच्या गर्भात अस्थिव्यंग बाळ वाढत असल्यामुळे उच्च न्यायालयाच्या परवानगीने आणि सोलापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या मदतीने विनामूल्य कायदेशीर गर्भपात करण्यास परवानगी मिळाली आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण विनामूल्य यासाठी मदत करते.

बातम्या आणखी आहेत...